ETV Bharat / city

बुधवारपासून 'सुमुल'कडून दूध स्विकारले जाईल - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यातील सुमुल दूध उत्पादक कंपनीने सोमवारी शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी गोवा विधानसभा परिसरात दूध ओतून निषेध व्यक्त केला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री सावंत यांनी सुमुलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

author img

By

Published : Jul 16, 2019, 7:07 PM IST

'सुमुल'कडून दूध स्विकारले जाईल - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी - सुमुल दूध उत्पादक कंपनीने सोमवारी गोव्यातील साळ आणि डिचोली भागातील शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले होते. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती.

शेतकऱ्यांकडून रस्त्यावर दूध ओतण्याची ही गोव्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेतील दालनात सुमुलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना, बुधवारी सुमुलच्या प्रादेशिक व्यवस्थापकांशी बैठक होणार आहे. आज त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता दूधात अँटिबायोटिकचा अंश सापडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उद्यापासून नियमित दूध स्वीकारून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे आपण सांगितले आहे. यामुळे बुधवारपासून 'सुमुल' दूध स्वीकारण्यास तयार असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.

सुमुलचे गोवा विभागाचे उपव्यवस्थापक (उत्पादन) उत्कल दवे यांच्याशी बातचीत केली असता, कालचा प्रकार शेतकरी आणि आमच्यातील संवादाच्या कमतरतेमुळे घडला आहे. ज्या दूधात अँटिबायोटिक आढळून आले होते. त्या दूधाचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासणी करिता पाठविण्यात येणार आहे. हा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे गायींना देण्यात आलेल्या अँटिबायोटिकचा अंश दूधात आढळतो. पावसाळ्यात अशा घटना आढळतात. यावर आम्ही काम करत आहोत, असे दवे यांनी सांगितले. मात्र कालच्या प्रकारात नेमकी चूक कोणाची आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

Intro:पणजी : 'सुमुल' दूध उत्पादक कंपनीने सोमवारी साळ आणि डिचोली भागातील शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी गोवा विधानसभा परिसरात दूध ओतून निषेध व्यक्त केला होता. त्याची दखल घेत आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सुमुलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना दूखवू नये अशा सूचना दिल्या आहेत.

Body:दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतण्याची गोव्यातील अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. याचे पडसाद आज विधानसभेतही उठले.
मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेतील आपल्या दालनात सुमुलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, बुधवारी सुमुलच्या प्रादेशिक व्यवस्थापकांशी बैठक होणार आहे. आज त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता दूधात अँटिबायोटिकचा अंश सापडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उद्यापासून नियमित दूध स्वीकारत शेतकऱ्यांना त्रास देऊ नये असे सांगितले आहे.
सोमवारी केलेल्या चाचणीमध्ये दुधामध्ये नेमके काय सापडले असे सुमुलचे गोवा विभागाचे उपव्यवस्थापक (उत्पादन) उत्कल दवे म्हणाले, कालचा प्रकार शेतकरी आणि आमच्यामधील संवादाच्या कमतरतेमुळे घडला. काल तपासण्यात आलेले दूधाचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासणी करिता पाठविण्यात येणार आहे. ज्यामध्ये अँटिबायोटिक आढळून आले होते. पावसाळ्यात अशा घटना आढळतात. कारण हा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे गायींना देण्यात आलेल्या अँटिबायोटिकचा अंश दूधात आढळतो. हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा संस्थेला ई माहिती आहे.
यावर आम्ही काम करत आहोत, असे सांगून दवे यांनी कालच्या प्रकारत चूक कोणाची हे सांगण्यास नकार दिला।
....
पहिली प्रतिक्रिया गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत. दुसरी उत्कल दवे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.