पणजी - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवार (दि.10) पासून सहभागी होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील भाजप उमेदवारांसाठी ते प्रचारसभा, कोपरा बैठका घेणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीर केलेल्या 40 स्टार प्रचारकांमध्ये डॉ. सावंत यांचाही समावेश आहे. त्याबद्दल आज त्यांना विचारले असता ते म्हणाले, गोवा भाजप कार्यकर्ते यापूर्वी कोकण आणि अन्य परिसरात भाजपच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. तर मी उद्यापासून (दि. 10) कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली आणि मुंबई परिसरात प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. येथील भाजप उमेवारांसाठी प्रचारसभा, कोपरा बैठका, युवकांशी संवाद आणि पत्रकार परिषदा घेणार आहे. हा सर्व प्रवास गाडीने होणार असल्याने किती मतदारसंघात पोहोचता येते हे पाहावे लागेल.
हेही वाचा - सर्वप्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी गोव्यात आता एकच क्रमांक
दरम्यान, मंगळवारी गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पुढील महिन्यात गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'इंडियन पॅनोरमा' विभागात एकही गोमंतकीय चित्रपट नसल्याने संताप व्यक्त केला होता. त्याबद्दल विचारले असता सावंत म्हणाले, त्याबद्दल मी संबंधितांशी चर्चा करणार आहे.
हेही वाचा - शिरीन मोदी खूनप्रकरणी मृत नोकरावर गुन्हा दाखल