ETV Bharat / city

गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामत यांची निवड

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह अन्य 9 आमदार भाजपमध्ये गेल्याने हे पद रिकामे झाले होते.

गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामत
author img

By

Published : Jul 18, 2019, 12:41 PM IST

पणजी - माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आजपासून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणार आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कामत यांची निवड अखिल भारतीय काँग्रेसने (एआयसीसी) मंजूर केली आहे. त्यानंतर बुधवारी उशिरा काँग्रेसने आपला विरोधी पक्षनेता जाहीर केला.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले बाबू कवळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हे पद रिकामे झाले होते. काँग्रेसमध्ये असलेल्या 5 आमदारांपैकी 4 जण माजी मुख्यमंत्री असल्याने ही माळ कोणाच्या गळ्यात पडते, याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. तर विरोधी पक्ष बनण्यासाठी 4 आमदारांची गरज होती.

गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामत

आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आलेल्या कामत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, विरोधी पक्षनेता ही एक आव्हानात्मक जबाबदारी आहे. अन्य विरोधी पक्षांशी समन्वय साधणे, ही आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. या पदासाठी माझी निवड राहुल गांधी यांनी केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

दरम्यान, आठवड्यापूर्वी सत्तेत असलेल्या गोवा फॉर्वर्डचे पक्षाध्यक्ष तथा फातोर्डयाचे आमदार विजस सरदेसाई यांनीही आपण सन्मानाने विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसणार आहोत आणि गोमंतकियांचे प्रश्न उपस्थित करत राहणार, असे म्हटले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल.

Intro:पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आजपासून विरोधी पक्षनेत्याची धुरा सांभाळणार आहेत. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील तीन दिवस विरोधी पक्षनेताच नव्हता. बुधवार उशीर काँग्रेसने आपला विरोधी पक्षनेता जाहीर केला.

Body:काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले बाबू कवळेकर अन्य 9 आमदारांसह भाजपमध्ये विलीन झाल्याने हे पद रिकामे झाले होते. काँग्रेसमध्ये असलेल्या पाच आमदारांपैकी चौघेजण माजी मुख्यमंत्री असल्याने ही माळ कोणाच्या गळ्यात पडते याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. विरोधी पक्ष बनण्यासाठी चार आमदारांची गरज होती.
आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आलेल्या काभत यांना याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता म्हणाले, विरोधी पक्षनेता ही एक आव्हानात्मक जबाबदारी आहे. अन्य विरोधी पक्षांशी समन्वय साधणे ही आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. या पदासाठी माझी निवड पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्याबद्दल आभाली आहे.
दरम्यान, आठवड्यापूर्वी सत्तेत असलेल्या गोवा फॉर्वर्डचे पक्षाध्यक्ष तथा फातोर्डयाचे आमदार विजस सरदेसाई यांनीही आपण सन्मानाने विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसणार आहेत आणि गोमंतकियांचे प्रश्न उपस्थित करत राहणार, असे म्हटले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल.
....
बाईट - दिगंबर कामत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.