पणजी - उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आय आय टी प्रकल्पावरुन बुधवारी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधाराचा मारा केला. तर लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे काही पोलीस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत. तर वाळपईत तणावपूर्ण वातावरण आहे. रात्री उशिरा पर्यंत आंदोलन पोलिस स्टेशनसमोर ठाण मांडून होते.
आंदोलक पोलीस स्टेशन समोर ठाण मांडून-
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज शेळ मेळावली येथे आंदोलन आपल्या मागणीसाठी एकत्र जमले होते. तेव्हा सरकारने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यासाठी महिला पोलीस समोर तैनात करण्यात आले होते. दुपारी आंदोलन आटोक्यात येत नसल्याचे दिसतात पोलिसांनी अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दुपारनंतर आंदोलनाचे स्वरूप बदलले आणि सर्व गोष्टी आंदोलकांनी आपला मोर्चा वाळपईपोलीस स्थानकाकडे वळविला. रात्री उशिरापर्यंत आंदोलक पोलीस स्टेशन समोर ठाण मांडून बसले होते.
सरकारच्या या फसवा-फसववीचे योग्य उत्तर दिले जाईल-
शेळ-मेळावली येथे आय आय टी प्रकल्प उभारण्याची सरकारने घोषणा केल्यापासून स्थानिक विरोध करत आहेत. मंगळवारी पुन्हा या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आंदोलक तेथील मुख्य रस्त्यावर जमा झाले होते. परंतु, सरकारने पोलिसीबळाचा उपयोग करून आंदोलकांना एकाच ठिकाणी थांबवून ठेवले. तर दुसरीकडे प्रकल्पासाठी जमीनीचे अधिकाऱ्यांनी सर्व्हेक्षण केले. याची आंदोलकांना कुणकुण लागताच तेथे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आपले काम आटोपून पोलीस बंदोबस्तात अधिकारी बाहेर पडले होते. सरकारच्या या फसवा-फसववीचे योग्य उत्तर दिले जाईल, असा इशारा शेळ मेळावली बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. प्रकल्प स्थलांतरित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांनी निर्धार केला आहे.
सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून हा आय आयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 13 लाख चौरस मीटर जमीन संपादित केली जाणार आहे. याविरोधा पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला काँग्रेस, आम आदमी पक्ष यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
विरोधी पक्षनेते कामत यांच्याकडून निषेध-
पोलिसांनी केलेला लाठी हल्ला आणि अश्रुधाराचा मारा हा सरकारच्या हुकूमशाहीचा प्रत्य देतो. ग्रामस्थांचा भाजपविरोध स्पष्ट दिसत आहे. सरकारने पोलीस आणि सरकारी यंत्रणेचा वापर केलेल्या द्रृष्यक्रृत्याचा निषेध करतो. अशाप्रकारे दबाव टाकून लोकांवर दबाव टाकून प्रकल्प उभारण्यात सरकार कधीच यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभेतील विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.
तर परशुराम गोमंत सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर आणि सहकारी यांनीही सरकारच्या या क्रुतिचा निषेध केला आहे.