पणजी - पणजी येथील हॉटेल सीदादी गोवा मध्ये भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. भाजपाचे अत्यंत महत्त्वाचे नेते आणि सर्व विजयी उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार देखील उपस्थित होते.
गोव्यात भाजपाने बहुमत मिळवल्यानंतर भाजपा कडून सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हॉटेल सीदादी गोवा मध्ये भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, भाजपाचे गोवा प्रचार प्रमुख आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह भाजपाचे निवडून आलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. दरम्यान विधिमंडळ पक्षाचा नेता आज निवडला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.