पणजी (गोवा) - राज्यात सध्याच्या घडीला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गोवा भेटीची चर्चा असताना भाजपाने वेळीच करेक्ट कार्यक्रम करण्याचा ठरविले आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते शेवटच्या 5 दिवसांत गोव्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेवून घरोघरी जाऊन उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. शेवटच्या 5 दिवसांत भाजपा मारणार प्रचारांत मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला गोव्यात येत आहेत. गुरुवारी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील जागेत ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसासाठी जाहीर सभा घेणार आहेत. तर शेवटच्या 5 दिवसात गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे पी नड्डा यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
नितीन गडकरी आज करणार जाहिरनाम्याचे प्रकाशन -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज दुपारी साडेबारा वाजता भाजपच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन करणार आहेत. त्यानंतर ते उत्तर गोव्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. गडकरी आज गोव्यात दाखल झाले आहेत.