पणजी - चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग भाजपा गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थित फुंकणार आहे. त्यासाठी राज्यात मोठी लगबग सुरू झाली आहे. शाह गुरुवारी सकाळी राज्यात दाखल होणार असून त्याच्या या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविली जाणार आहे. तत्पुर्वी बुधवारी राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व सी टी रवी गोव्यात दाखल झाले आहेत.
दौऱ्याची तयारी पूर्ण, रस्ते चकाचक -
अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमस्थळ एसआयटीने ताब्यात घेतली असून त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजित मार्गावरील रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करून ते चकाचक करण्यात आले आहे. शहांच्या दौऱ्याच्या तयारीवर आपची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे राज्यातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, मागच्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेले रस्ते वेळोवेळी मागणी करूनही सुधारण्यात आले न होते, मात्र त्यांच्या दौऱ्यामुळे हे रस्ते नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय नेत्यांच्या आगमनामुळे का होईना भाजपाला हे रस्ते दुरुस्त करण्याचे शहाणपण सुचले अशी उपरोधिक टीका आम आदमी पक्षाने केली आहे.
असा असेल अमित शहा यांचा दौरा -
- सकाळी गोवा विमानतळावर आगमन दुपारी एक वाजता
- धारबंदोडा येथील फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे भूमिपूजन दुपारी दोन वाजता
- फोंडा कुर्टी येथील विद्यापीठ इमारतींचे उद्घाटन दुपारी ३ वाजता
- तालिगाव कम्युनिटी हॉल येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन संध्याकाळी ६ वाजता
- पक्षाचे आमदार, मंत्री यांच्याशी बैठक व मार्गदर्शन
संध्याकाळी भाजपाच्या कोअर कमिटीशी चर्चा आणि मार्गदर्शन दरम्यान अमित शहा यांच्या या दौऱ्यामुळे मंत्री, आमदार यांच्यात चैतन्याचे वातावरण असून या दौऱ्यात आगामी युतीबाबत भाजपाची केंद्रीय समिती निर्णय घेणार असल्याची माहिती निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यनला 'जेल की बेल'?; आज न्यायालय देणार निकाल