ETV Bharat / city

'आप' सरकारच गोमंतकियांना जमीन हक्क देऊ शकते - राघव चड्डा

प्रस्तावित आयआयटी प्रकल्पविरोधात शेळ-मेळावली आंदोलन सुरू आहे. या आंदोलकनकर्त्यांना आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह कॉंग्रेसवरही टीका केली.

aap government can give land rights to gomantakis said raghav chadda in panji
'आप' सरकारच गोमंतकियांना जमीन हक्क देऊ शकते - राघव चड्डा
author img

By

Published : Jan 16, 2021, 10:19 PM IST

पणजी - शेळ-मेळावलीतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पविरोधाने गोव्यातील जमीनप्रश्न समोर आला आहे. हा प्रश्न भाजपा अथवा काँग्रेस सोडवू शकत नाही. केवळ आम आदमी पक्षच गोमंतकियांना जमिनीचे हक्क देऊ शकते, असा दावा आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी केला आहे.

राघव चड्डा यांची प्रतिक्रिया

जगभरात गोव्याची बदनामी झाली -

आज मी शेळ-मेळावली येथे जाऊन आंदोलकनकर्त्यांना भेटून आलो आहे. त्यांच्या समोर पक्षाच्या भावना व्यक्त केल्या आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यामातून लागवडीखालील जमीन हडप करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. परंतु या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी हल्ला केला. ज्यामुळे जगभरात गोव्याची बदनामी झाली असल्याचा आरोप आमदार राघव चढ्ढा यांनी केला. तसेच आप पक्ष तुम्हाला लोकांच्या भावना दाबू देणार नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिला. तसेच आगामी काळात आम आदमी पक्षाचे पूर्ण बहुमताचे आणि स्थिर सरकार स्थापन केले जाईल. काँग्रेस आमदारांप्रमाणे आपचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, याची खात्री देतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या वडिलांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.