ETV Bharat / city

नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात युवकांची स्टंटबाजी - stunts in water

नाशिकमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे भरली असून धरणांतील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून, दुतोंड्या मारुती आणि रामसेतु पुल बुडाला आहे. तरीसुध्दा काही अतिउत्साही युवक गाडगे महाराज पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारून स्टंट करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी करू नये व पुराच्या पाण्यात उतरू नये अशा सूचना दिल्या.

पुराच्या पाण्यात युवकांची स्टंटबाजी
author img

By

Published : Aug 3, 2019, 8:30 PM IST

नाशिक- गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुतोंड्या मारुती आणि रामसेतु पुल पाण्यात बुडाला आहे. तरीही अतिउत्साही युवक पुराच्या पाण्यात उड्या मारून जीव घेणे स्टंट करत असून, पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.

पुराच्या पाण्यात युवकांची स्टंटबाजी
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे गंगापूर धरण 90 टक्के भरल्याने या धरणाचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले असून, दुपारी 2 वाजल्यापासून गंगापूर धरणातून 17748 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून, रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीसोबत रामसेतु पुलही बुडाला आहे. पूर बघण्यासाठी नाशिककरांची पंचवटी परिसरात मोठी गर्दी होते आहे. यातच काही अतिउत्साही युवक गाडगे महाराज पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारून स्टंट करत आहेत. मात्र, याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून अशाप्रकारचे जीवघेणे स्टंट एखाद्याच्या जिवावर बेतू शकतात. त्यामुळे अशा अतिउत्साही युवकांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी करू नये व पुराच्या पाण्यात उतरू नये अशा सूचना दिल्या आहेत.

या धरणांतून होतोय पाण्याचा विसर्ग :

  • गौतमी गोदावरी- 6225 क्युसेस,
  • आनंदी धरण- 687 क्युसेस
  • दारणा धरण- 23192 क्युसेस
  • भावली धरण- 1509 क्युसेस
  • वालदेवी धरण- 502 क्युसेस
  • नांदुर मध्यमेश्वर धरण- 83773 क्युसेस
  • पालखेड धरण- 5007 क्युसेस
  • चणकापूर धरण- 7307 क्युसेस
  • पुनद धरण- 2895 क्युसेस

Intro:गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी,पुराच्या पाण्यात युवकांचे जीवघेणे स्टंट...

Body:नाशिक मध्ये गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून,दुतोंड्या मारुती आणि रामसेतू पुल बुडाला आहे,मात्र दुसरीकडे अति उत्साही युवक पुराच्या पाण्या उड्या मारून जीव घेणे स्टंट करत असून पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे...

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे, त्यासोबतच गंगापूर धरण देखील 90 टक्के भरल्याने या धरणातील सर्व दरवाजे खुले करण्यात आले असून दुपारी 2 वाजेपासून गंगापूर धरणातून 17748 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जातोय ,त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडला असून रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती सोबत रामसेतू पुल ही बुडाला आहे,
तसेच पूर बघण्यासाठी नाशिककरांची पंचवटी परिसरात मोठी गर्दी होते आहे,यातच काही अति उत्साही युवक गाडगे महाराज पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारून स्टंट करत आहे,मात्र याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून अशाप्रकारचे जीवघेणे स्टंट एखाद्याच्या जिवावर बेतू शकतात त्यामुळे अशा अतिउत्साही युवकांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होतेय,प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी करू नये आणि पुराच्या पाण्यात उतरू नये अशा सूचना दिल्या आहेत..

ह्या धरणातून होतोय पाण्याचा विसर्ग...
गौतमी गोदावरी धरणातुन 6225 क्युसेस,
आनंदी धरण 687 क्युसेस
दारणा धरण 23192 क्युसेस
भावली धरण 1509 क्युसेस
वालदेवी धरण 502 क्युसेस
नांदुर मध्यमेश्वर धरण 83773 क्युसेस
पालखेड धरण 5007 क्युसेस
चणकापूर धरण 7307 क्युसेस
पुनद धरण 2895 क्युसेस

टीप फीड ftp
nsk godavari flood stunt viu 1
nsk godavari flood stunt viu 2
nsk godavari flood stunt viu 3
nak godavari flood stunt viu 4

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.