नाशिक - पत्नी आणि दिराच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी महिलेच्या सून आणि पुतण्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कपिल सुरेश भूतकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - ७,२४२ बाधितांची नोंद, १९० रुग्णांचा मृत्यू
कपिल भूतकर यांनी मंगळवारी केली होती आत्महत्या -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतण्या भागवत रामभाऊ भुतकर आणि सून यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती पती व तक्रारदार महिला अर्थात सासूला समजली होती. त्यातून सून आणि पुतण्या हे मुलाचा छळ करत होते. दोघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. कपिल भूतकरांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. याउलट त्रास अधिकच वाढला होता. या दोघांचा छळ असहाय झाल्याने कपिल भूतकर यांनी मंगळवारी राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.
दोघांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी -
सून आणि पुतण्या भागवत रामभाऊ भुतकर या दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे मुलगा कपिल याने आत्महत्या केल्याचे अरूणा भूतकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारीनंतर सातपूर पोलिसांनी संशयित आरोपी सून आणि पुतण्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
हेही वाचा - पूरग्रस्तांना अधिकच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणू - देवेंद्र फडणवीस