नाशिक - पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मुलगी व आईमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला होता. त्यामुळेच आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते.
दरम्यान, कौटुंबिक वादातून महिलेने सोमवारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांतर महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरजिंदर संधू यांनी कळवले होते की, त्यांची मुलगी अमनप्रित संधू हिचे लग्न 18 जानेवारीला रायपूर येथे झाले होते. मात्र, माहेरी काही न सांगता मुलगी ही नाशिकला मैत्रीणीकडे आली. मला सासरी आणि माहेरीपण रहायचे नाही, अशी भूमिका तिने घेतली. मुलगी नाशिकला आल्याने वडिलांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात मुलगी मिसिंगची तक्रार दिली. मुलीला बोलावून तिला काय वाटतं, याबाबत विचारणा करण्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. मुलीनेदेखील मला माहेरी आणि सासरी रहायचे नाही असे लिहून देत, मी माझ्या मैत्रीणीकडे राहणार असल्याचे सांगितले. तसेच माला व्यक्तीस्वातंत्र्य असल्याचेही तिने सांगितले. यावर वडिलांनीदेखील मान्यता दिली.
दरम्यान, याच कौटुंबिक वादातून मुलीची आई हरजिंदर सिंग संधू या गाडीवरून पोलीस ठाण्यात येताच त्यांनी मुलीला तू सासरी जा, असे सांगत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजारी उभ्या असलेल्या कुटुंबातील नागरिकांनी हरजिंदर सिंग संधू यांना लगेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या घटनेत हरजिंदर सिंग संधू या 80 टक्के भाजल्या होत्या. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -