नाशिक - ओमिक्रॅान विषाणुचा धोका लक्षात घेता नाशिकमध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलनात येणाऱ्या रसिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार आहे.
ओमिक्रॅान व्हायरसचा धोका लक्षात घेता राज्य सरकार सतर्क झाले आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात 3 ते 5 डिसेंबर रोजी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) दक्षता घेतली जाणार आहे. संमेलनात होणारी गर्दी लक्षात घेता 'नो व्हॅक्सिन नो इंट्री'चा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वार येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लस घेतल्याचे प्रमाणात दाखवावे लागणार आहे. एक लस घेतली असल्यास त्याचा पुरावा दाखविणे गरजेचे आहे. मास्क वापरणेदेखील बंधनकारक असणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणीदेखील आयोजकांकडून सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे, या पध्दतीचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा-Primary Schools reopen : १ डिसेंबरपासून १ ली ते ४ थीच्या शाळा सुरू होणार; 'अशी' आहे नियमावली
लहान मुलांना सूट
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा बालकुमार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात बालकांसाठी विविध विषयांवर कार्यक्रम होणार आहे. मुलांसाठी कोरोना लस अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनासाहित्य संमेलनात थेट प्रवेश मिळणार आहे. मात्र, मुलांनीदेखील मास्क, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा-Omicron virus threat in Maharahstra : विदेशातून आलेल्या १ हजार पर्यटकांचा शोध सुरू - आदित्य ठाकरे
असे होतील कार्यक्रम ( Marathi Sahitya Sammelan detailed program )
पहिला दिवस : शुक्रवार दि. 3 डिसेंबर 2021
सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँ पर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नाॅलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल. संमेलनस्थळी सकाळी 11 वाजता ध्वजाराेहणाचा कार्यक्रम महामंडळाचे तसेच संमेलन पदाधिकारी, स्वागत समिती सदस्य तसेच निमंत्रित, साहित्यिक, रसिक आदींच्या उपस्थितीत हाेणार आहे. दुपारी 4 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन हाेईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण होईल, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले ( Hemant Takele on Sanhitya Sanmelan ) यांनी सांगितले.
हेही वाचा-Parambir Singh Sachin Vaze discussion : परमबीर सिंग, सचिन वाझे यांची बंद दाराआड तासभर चर्चा
रात्री 9 वाजता निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन हाेईल. कवि श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून सूत्रसंचलन संजय चाैधरी हे करणार आहेत. या कविसंमेलनासाठी महाराष्ट्रातील कवी आहेत. याशिवाय भाेपाळ, गाेवा आणि गुजरात या राज्यातील कवीही निमंत्रित आहेत.
दुसरा दिवस : शनिवार दि. 4 डिसेंबर 2021
सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डाॅ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डाॅ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. लक्षवेधी कवी म्हणून सर्वश्री प्रुल्ल शिलेदार, किशाेर कदम (साैमित्र), सुचिता खल्लाळ, खालील माेमीन आणि वैभव जाेशी या कवींसमवेत श्री. विश्वाधार देशमुख आणि गाेविंद काजरेकर हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखविणार आहेत.
परिचर्चा कार्यक्रम
दुपारच्या सत्रात ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयाेजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डाॅ, एकनाथ पगार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जाेशी, रेखा इनामदार साने, डाॅ. गजानन जाधव आणि डाॅ. माेना चिमाेटे हे सहभागी हाेणार आहेत.
कथाकथन
दुपारच्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली हाेईल. आघाडीचे कथाकार गिरीश देसाई, विद्याधर बनसाेड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ हे आपल्या कथा सादर करतील. कथाकथनाचे प्रात्यक्षिक म्हणून हा साहित्य संमेलनात महत्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे.
परिसंवाद
सायंकाळी काेराेनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर श्री. जयदेव डाेळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद हाेणार असून त्यामध्ये सर्वश्री मकरंद कुलकर्णी, डाॅ. आशुताेष रारावीकर, विनायक गाेविलकर, डाॅ. हंसराज जाधव, दीपक करंजीकर, डाॅ. राहुल रनाळकर हे वक्ते म्हणून असतील.
सायंकाळी गाेदातिरीच्या संतांचे याेगदान - श्री. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाèया या परिसंवादामध्ये श्रीमती धनश्री लेले, प्रा. विवेक अलाेणी, चारुदत्त आफ़ळे, डाॅ. दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिशप थाॅमस डाबरे, डाॅ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांस वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.
कविकट्टा
संमेलनस्थळी कविकट्ट्याचे आयाेजन केले असून हा कविकट्टा सलग 2 रात्री सुरू राहणार आहे. संयाेजन राजन लाखे, संदिप देशपांडे आणि संताेष वाटपाडे हे करणार आहेत. महाराष्ट्रातील 700 कवी आपापल्या रचना सादर करणार आहेत.
बाल साहित्य मेळावा
साहित्य संमेलनाला जाेडून यावर्षी प्रथमच बाल साहित्य मेळावा हाेत आहे. दि. 4 डिसेंबर 2021 राेजी सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली हाेणार आहे.
कला प्रदर्शन
संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही तेथे आयाेजित केले आहे.
नाशिक लेखक पुस्तक प्रदर्शन
कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
तिसरा दिवस दि. 5 डिसेंबर 2021
परिसंवाद
सकाळी ‘मराठी नाटक - एक पाऊल पुढे, दाेन पावले मागे शफ़ाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या या परिसंवादामध्ये वक्ते श्रीमती लता नार्वेकर, पराग घाेंगे, डाॅ. सतीश साळुंके, सुबाेध भावे आणि प्राजक्त देशमुख यांना निमंत्रित केले आहे.
सकाळी ‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदाेलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे माैन आणि सेलिब्रिटींची भूमिका ’ श्री. भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या या परिसंवादामध्ये आमदार बच्चू कडू, रमेश जाधव, मिलींद मुरुगकर व संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे.
दुपारी ‘ऑनलाईन वाचन - वाङमय विकासाला तारक की मारक’ - डाॅ. दिलीप धाेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या या परिसंवादामध्ये वक्ते म्हणून वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डाॅ. विलास साळुंके, मयुर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे.
दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थाेतांड - डाॅ. निलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डाॅ. भगवान कारे, डाॅ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढाेके यांचा सहभाग असेल.
नाशिक जिल्हा विशेष परिसंवाद :
नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हाेणार आहे.
संमेलनाचा समाराेप रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021 राेजी सायंकाळी 6 वाजता हाेईल. समाराेपानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन केले आहे.