ETV Bharat / city

नाशिक शहरात दुचाकी चोरी करणारे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Two wheeler thief Ganesh Malunjkar arrested

शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघा जणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरट्यांना शुक्रवारी अंबड लिंक रोड परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. आरोपींमध्ये एका तडीपार गुंडाचा देखील समावेश असून त्यांच्याकडून तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Two wheeler thief arrest ambad police
गणेश मालुंजकर अटक अंबड पोलीस
author img

By

Published : May 22, 2021, 4:34 PM IST

नाशिक - शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघा जणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरट्यांना शुक्रवारी अंबड लिंक रोड परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. आरोपींमध्ये एका तडीपार गुंडाचा देखील समावेश असून त्यांच्याकडून तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख

हेही वाचा - नाशिकमध्ये म्यूकरमायकोसिसचे 180 रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

नाशिक शहरात गुन्हेगारी बळावत आहे. अशात शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या दुचाकी चोरांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मात्र, अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर अंबड पोलिसांना दुचाकी चोरी करणाऱ्या तिघा जणांना अटक करण्यात यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी अंबड लिंक रोड परिसरात सापळा रचून गणेश मालुंजकर, ऋषिकेश जाधव यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याचबरोबर पोलिसांनी तडीपार गुंड अक्षय जाधव याला देखील अटक केली.

३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

गणेश मालुंजकरकडून अंबड पोलिसांनी तीन लाख रुपये किंमतीच्या जवळपास दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. अंबड पोलिसांनी अतिशय शिताफीने केलेल्या या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - येथे माणूसकी ओशाळली.. कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेऊन नातेवाईक पसार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.