ETV Bharat / city

त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांना दर्शनासाठी आजपासून खुले, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार -विश्वस्त - नाशिक लेटेस्ट न्यूज

कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घटस्थापनेचा मुहूर्त साधत आजपासून धार्मिक स्थळ खुली करण्यात आलेली आहे. तब्बल सहा महिन्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने भाविकांनी मंदिरांमध्ये आता गर्दी करायला सुरुवात केली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांना दर्शनासाठी आजपासून खुले,

author img

By

Published : Oct 7, 2021, 12:27 PM IST

Updated : Oct 7, 2021, 1:00 PM IST

नाशिक - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे मंदिरही आज पहाटेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. आज घटस्थापनेच्या निमित्ताने मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर मंदीर परिसरात रांगोळी देखील काढण्यात आली आहे. आजपासून दररोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून दररोज 5 हजार भाविकांनाच त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेता येणार आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांना दर्शनासाठी आजपासून खुले

दहा वर्षाखालील मुलांनी आणि 65 वर्षावरील वृद्धांनी मंदिरात येण्याचा मोह टाळावा-

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे राज्यभरातील भाविकांची वर्षभर कायमच गर्दी राहते आज पहाटे पासूनच भाविकांनी याठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. तर त्रंबकेश्वर देवस्थान व्यवस्थापनाकडून देखील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे.पूर्व मंडपातून भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था केली जात आहे. दोन भाविकांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील याप्रमाणे मार्किंग करण्यात आले आहे. दहा वर्षाखालील मुलांनी आणि 65 वर्षावरील वृद्धांनी मंदिरात येण्याचा मोह टाळावा असे आवाहन विषवस्थाच्या वतीने करण्यात आले आहे. तर मंदिराच्या उत्तर मंडपातून सशुल्क दर्शन दिले जाईल त्यासाठी प्रती व्यक्ती 200 रु पास असणार आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अथवा 72 तासातील आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट मंदिर प्रवेशासाठी अनिवार्य असणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भाविकांना मंदिराध्ये प्रवेश...

गेली 6 महिने भाविकांना मंदिराच्या बंद द्वारा वर दर्शन घेऊन समाधान मानावे लागत होते. घटस्थापनेला अखेर मंदिराची द्वार खुली झाल्यानंतर भाविकांनी आज पहाटे पासूनच आपली पाऊले मंदिरा कडे वळवली आहे. त्र्यंबकेश्वर मधील श्री त्रंबकेश्वर मंदिर कुशावर्त तीर्थ श्री संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर श्री स्वामी समर्थ मंदिर श्री गजानन महाराज मंदिर आदी ठिकाणी भाविकांच्या रांगा दिसून येत आहे .शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भाविकांना मंदिराध्ये प्रवेश दिला जात आहे.

हेही वाचा - VIDEO : अजित पवार आणि जयंत पाटील यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

Last Updated : Oct 7, 2021, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.