ETV Bharat / city

नाशकात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; मग खासगी रुग्णालयात रुग्णसंख्या का झाली कमी?

कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक अधिक सतर्क झाले असून स्वतःसह कुटुंबाची काळजी घेताना दिसून येत आहेत. यात घराबाहेर पडताना मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, गरम वाफ घेणे किंवा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित गरम पाणी, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. यामुळे काही प्रमाणात सर्दी, खोकला, ताप व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी झाला असून परिणामी खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 50 टक्के घट झाल्याचे डॉक्टर सांगतात.

नाशिक कोरोना
नाशिक कोरोना
author img

By

Published : Jul 23, 2020, 5:12 PM IST

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असला तरी खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र घटली असल्याचे चित्र आहे. सध्या सर्वच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीती असल्याने नागरिक स्वतःची काळजी घेताना दिसून येत आहेत. यात घराबाहेर पडताना मास्क वापरणे, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वारंवार आयुर्वेदिक औषधांचे सेवन करणे इत्यादींचा समावेश आहे. यामुळेच काही प्रमाणात सर्दी खोकला यांसारख्या साथीच्या आजारात देखील घट झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे इतर आजारांचा प्रभाव कमी होतोय?
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 10 हजाराच्या पार गेली आहे, तर 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक अधिक सतर्क झाले असून स्वतःसह कुटुंबाची काळजी घेताना दिसून येत आहेत. यात घराबाहेर पडताना मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, गरम वाफ घेणे किंवा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित गरम पाणी, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. यामुळे काही प्रमाणात सर्दी, खोकला, ताप व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी झाला असून परिणामी खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 50 टक्के घट झाल्याचे डॉक्टर सांगतात.

हेही वाचा - जिमसह शॉपिंग मॉल सुरू करण्याचा सरकारचा विचार; लोकल रेल्वेचा निर्णय मुख्यमंत्री घेतील- आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण रुग्णालयात जात नाही -

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्दी, खोकला यासारखे आजार झाल्यास काहीजण रुग्णालयात जात नाही, असे देखील निदर्शनास आले आहे. रुग्णालयात गेलो तर डॉक्टर कोरोना टेस्ट करण्यास सांगतील आणि मग रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर? रुग्णालय, त्याला लागणारा खर्च या भीतीपोटी काही रुग्ण रुग्णालयाची पायरी चढत नसून घरीच उपचार घेत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

इतर आजारांचा नागरिकांना विसर, फक्त कोरोनाचाच बोलबाला -

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून इतर आजारांचा प्रादुर्भाव कमी झाला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून जून आणि जुलै या महिन्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूसारखे आजार आपले डोके वर काढतात. यंदा मात्र मागील पाच वर्षांत पाहिल्यांदाच या आजारांचे रुग्ण आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुग्णालयात येण्यास वाहनांची व्यवस्था नाही -

नाशिकमध्ये अनलॉक सुरू असले तरी प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात परवानगी दिलेली नाही. परिणामी बस आणि रिक्षा अद्याप बंद असून दुचाकीवर देखील एका व्यक्तीलाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयात येण्यास रुग्णांना अडचण येत असल्याचे डॉक्टर शरद पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - स्पेशल रिपोर्ट; आधार कार्ड सक्ती असूनही होतोय 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.