नाशिक - भाजपा नेते चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 'गेल्या दीड वर्षापासून शेतकरी मोठ्या चिंतेत होता. त्यांचा शेवटी विजय झाला आहे. शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत, जर हे कुणाला दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल. मी त्यांना शोकसंदेश पाठवतो. आपण त्यांच्यासाठी शोकसभा घेऊ', असे संजय राऊत (sanjay raut) म्हणाले.
याचबरोबर संजय राऊत यांनी कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांच्यावर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणौतला लगावला. तसेच त्यांनी सुनील शिंदे यांच्यावर भाष्य केले. सुनील शिंदे यांनी आपली निष्ठा दाखवली. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला आत्मीयता ही कायमच राहिली. परंतु सुनील शिंदे यांनी आपली निष्ठा दाखवली. म्हणून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली, असा स्पष्ट खुलासा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
परिवहन मंत्री हे एसटी कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र लक्ष घालत आहेत. राज्य परिवहन मंत्री हे एसटी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र लक्ष घालत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे आम्हाला देखील वाटतं आणि ते सोडवले देखील आहेत. विलीनीकरण हा एकच विषय राहिला असून हायकोर्टाचे काही निर्देश आहे. त्यानुसार ते काम करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर दिली.
भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे (Devayani Farande) यांच्या कन्येच्या विवाहासाठी संजय राऊत आज नाशिकमध्ये आलेले आहेत. यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन केलं. नाशिक जिल्हा संपर्क नेते भाऊ चौधरी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर लग्न हा पक्षाचा सोहळा नसतो. तो एक कौटुंबिक सोहळा असतो. अनेक कौटुंबिक सोहळ्यासाठी मी आज उपस्थित असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.