नाशिक - नाशिक मध्ये पावसामुळे रस्त्याची पोलखोल झाली आहे. काही महिन्यापूर्वी करोडो रुपये खर्च करून महानगरपालिकेकडून ( Nashik Municipal Corporation ) बांधण्यात आलेल्या रस्त्यांची चाळण झाल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे देखील कठीण झाले असून अनेक ठिकाणी अपघात होत आहे.
महानगरपालिकेच्या कामाचा निषेध करत नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे ( Social worker Sachin Ahire ) यांनी चक्क रस्त्यात बसून खड्ड्यांचे श्राद्ध घालत आंदोलन केले आहे. तर यांच्या आंदोलनाची चर्चा होत असून आता तरी महानगरपालिकेला जाग येते का असा प्रश्न नाशिकर विचारत आहेत. ( Sachin Ahires Agitation In Nashik Over Repair Of Inferior Roads )
रस्त्यात बसून घालतले खड्ड्यांचे श्राद्ध - यामुळे नागरिकांमधील संताप व्यक्त होत आहे. सामाजिक संघटनांनी अनेकदा महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र त्याचा फारसा फायदा नसल्याने नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी चक्क रस्त्यात बसून खड्ड्यांचे श्राद्ध घालत महानगरपालिकेच्या कामाचा निषेध केला आहे. रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी व संबंधित महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी सचिन अहिरे यांनी केली आहे.