ETV Bharat / city

Road Accident Increased : 2021 वर्षात नाशिक शहरातील अपघातात 163 जण ठार; हेल्मेट सक्ती गरजेची

नाशिकमध्ये अपघातांची संख्या वाढली (Road Accident Increased in Nashik) आहे. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षात अपघातात मोठी वाढ झाली आहे. 12 महिन्यात राज्य महामार्ग आणि शहरांतर्गत रस्त्यावर 155 अपघातात 163 मृत्यू झाले.

road accident
ली रस्ते अपघातात वाढ
author img

By

Published : Jan 7, 2022, 3:36 AM IST

नाशिक - शहरांतर्गत रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली (Road Accident Increased in Nashik) आहे. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षात अपघातात मोठी वाढ झाली आहे. 12 महिन्यात राज्य महामार्ग आणि शहरांतर्गत रस्त्यावर 155 अपघातात 163 मृत्यू झाले, तर 306 जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरांतर्गत रस्त्यावर झालेल्या अपघातात 40 विना हेल्मेट चालकांचा मृत्यू झाला आहे.

वाहतूक पोलीस, आरटीओ विभाग, रस्ते सुरक्षा समिती यांच्याकडून अपघात कमी व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरी देखील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. नाशिक शहरातून जाणारे मुंबई- आग्रा महामार्ग, औरंगाबाद -नाशिक महामार्ग, नाशिक-पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2021 या बारा महिन्याच्या कालावधीत अपघातांची संख्या बघता सर्वाधिक 22 अपघात मार्चमध्ये झाले असून त्यात 22 जणांचा बळी गेला आहे, तर सर्वाधिक कमी अपघात एप्रिलमध्ये झाले असून 8 अपघातात 8 जणांचा बळी गेला आहे.

  • अल्पवयीन मुलांचा समावेश

रस्ते अपघातात 15 ते 16 वयोगटातील वाहनचालक मुलांचा समावेश दिसून येत आहे. या वयोगटातील मुले सर्रासपणे रात्रीच्या वेळी विना हेल्मेट वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसून आले आहे.

  • विना हेल्मेट चालकांचा मृत्यू -

नाशिकच्या रस्ते अपघातात विना हेल्मेट चालकांची संख्या सर्वाधिक आहे. शहरअंतर्गत रस्त्यावर झालेल्या अपघातात 40 विना हेल्मेट चालकांचा मृत्यू झाला आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी हेल्मेट सक्तीसाठी विशेष मोहीम राबवली आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल या मोहिमेत पेट्रोल पंपचालकांनी वाहनचालकाला पेट्रोल दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच 14 जानेवारीपासून विना हेल्मेट वाहनचालकांकडून 500 रुपयांचा दंड वाहतूक पोलीस आकारत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन नाशिक पोलिसांनी नागरिकांना करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.