नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तरी टेस्टींगवर अधिक भर देण्यात यावा, जेणेकरून बाधित रूग्णांना योग्य वेळेत उपचार होऊन प्रसार नियंत्रणात राहील, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. तसेच पावसाळा सुरू होताच, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया या आजारांबाबात ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करण्यात यावी, तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर द्यावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.
'लसींच्या उपलब्धतेबाबत दर्शनी भागात फलक लावावे' -
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण एकसमान राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजन करण्यात यावे. तसेच लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये, याकरीता लसीकरण केंद्रांमधील लसींच्या उपलब्धतेबाबत दर्शनी भागात फलक लावण्यात यावेत, जेणेकरून लसीकरण केंद्रांवर गर्दी नियंत्रणात राहील. पावसाळा सुरू होताच इतर साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. संध्या जिल्ह्यात डेंग्यू व चिकणगुनिया रूग्णामध्ये वाढ होत असून अधिकाऱ्यांनी रुग्ण संख्या कमी होते, जास्त होते, हे पहाण्यापेक्षा प्रत्यक्ष या आजारांबाबात ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करण्यात यावी. तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर द्यावा. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू रूग्णाला रूग्णवाहिका उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
'आरोग्य सुविधेच्या बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करावा' -
जिल्ह्यातील क्षयरोग रूग्णांची संख्या सर्वात कमी असल्याने त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिका आरोग्य यंत्रणा यांनी समन्वयाने जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी नवनवीन उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करावा, अशा सुचनाही डॉ. पवार यांनी दिल्या आहेत. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी असला, तरी नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ९५० रुग्ण आहेत. जिल्ह्यात २७ ऑक्सिजन फ्लॅटचे प्रगतीपथावर चालू आहे. हे काम झाल्यावर दिवसाला ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळू शकतो, असे डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा - मुंबईच्या विद्यार्थीनीवर म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्कार, वाचा कोण काय म्हणाले...