ETV Bharat / city

गोदावरीच्या पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांची बचावपथकाने केली सुटका - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग

गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने नाशिक शहरात पूरस्थिती निर्माण झाली. शहर आणि चांदोरी, सायखेडा गावामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांची बचावपथकाने सुटका केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बचावपथक नागरिकांची सुटका करताना
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:39 PM IST

Updated : Aug 4, 2019, 10:21 PM IST

नाशिक - जिल्ह्यामध्ये दोन दिवस झालेल्या मुसळधार पावासामुळे गंगापूर धरण 90 टक्के भरले. यामुळे धरणातून 43 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला पूर आला. पुराचे पाणी शहरातील गंगापूर रोड भागातील नदीकाठच्या सोसायटी तसेच बंगल्यांमध्ये गेले. त्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना नाशिकच्या अग्निशामक दलाच्या बोटीच्या सहाय्याने सुरक्षित घराबाहेर काढण्यात आले.

बचावकार्य

नाशिक जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिक घरात अडकून पडले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफचे पथक आणि भोसला मिलिटरीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून शेकडो नागरिकांना बोटीच्या साह्याने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले.

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली मात्र जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी रेस्क्यू टीम आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्याधरणांमधून सुरु असणारा पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरण- 45486 क्यूसेक दारणा धरण- 40342 क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर धरण- 291525 क्यूसेक भावली धरण 2159 क्यूसेक
पालखेड धरण- 67706 क्यूसेक चनकापूर - 17207 क्यूसेक
हरणबारी - 9157 क्यूसेक पुणेगाव - 5673 क्यूसेक
होळकर पूल - 62006 क्यूसेक आळंदी धरण- 8865 क्यूसेक

Intro:गोदावरीच्या पुरात अडकलेल्या शेकडो नागरीकांना रेस्क्यू टीम ने दिला मदतीचा हात...

Body:नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला,गंगापुर धरण 90 टक्के भरल्याने ह्यातून 43 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला..ह्यामुळे नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना मोठा फटका बसला,

तसेच नाशिक जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिक घरात अडकून पडले होते, अशात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, एन डी आर एफ टीम आणि भोसला मिलिटरी च्या विद्यार्थ्यांनी ने शर्तीचे प्रयत्न करून शेकडो नागरिकांना बोटीच्या साह्याने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले...

नाशिक शहरातील गंगापूर रोड भागातील नदीकाठी काठच्या सोसायटी तसेच बंगल्यांमध्ये सुद्धा पुराचं पाणी गेले,त्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिक सुद्धा नाशिकच्या अग्निशामक दलाच्या बोटीच्या सहाय्याने सुरक्षित घराबाहेर काढण्यात आले..ह्या पुरा मुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नसून, सर्वांनी रेस्क्यू टीम तसेच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले...

टीप फीड ftp
nsk flood rescue viu 1
nsk flood rescue viu 2

Conclusion:
Last Updated : Aug 4, 2019, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.