ETV Bharat / city

नाशिक मनपा आयुक्त रस्त्यावर; दोन हॉटेलवर केली दंडात्मक कारवाई - मनपा आयुक्त कैलास जाधव

नाशिकमध्ये आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून मागील दहा दिवसांपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे.

Punitive action taken against two hotels for violating corona rules in Nashik
नाशिक मनपा आयुक्त रस्त्यावर
author img

By

Published : Mar 14, 2021, 1:53 AM IST

नाशिक - शहरातील कॉलेज रोड परिसरातील दोन हॉटेलमध्ये मनपा आयुक्तांनी पाहणी केली. या हॉटेलमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक असल्याने व सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यानं त्यांच्यावर धडक दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मनपा प्रशासन अ‌ॅक्शन मोडमध्ये-

नाशिकमध्ये आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून मागील दहा दिवसांपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. मात्र दुसरीकडे नागिरक सर्रास नियमांचे उल्लंघन करतांना दिसून येत असल्याने मनपा प्रशासन आता अ‌ॅक्शन मोडमध्ये आलं आहे. आज स्वतः मनपा आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी-

तसेच कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरातील हॉटेलची पाहणी केली. यात गंगापूर रोड वरील पकवान, आणि कॉलेज रोड भागातील ग्रीन फिल्ड कृष्णा या हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असल्याचे आढळून आले. या ठिकाणी 50 टक्के आसन क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक आढळून आले. तसेच सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने मनपा आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत दोन्ही हॉटेलला प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन-

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे काही हॉटेल आर्थिक हिता साठी ग्राहकांचा जीव धोक्यात घालून सर्रास कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे.
या कारवाईत मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे तसेच मनपा व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते..

शहरात सर्वधिक रुग्ण-

13 मार्च रोजी शहरात 811 नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. तर 5 हजार 492 जण उपचार घेत आहेत.आतापर्यंत शहरात 86 हजार 610 रुग्ण मिळून आले असून 80 हजार 57 जण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे 1 हजार 61 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात 564 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

हेही वाचा- मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वझे यांना एनआयए'ने केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.