ETV Bharat / city

raid Raza Academy रझा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा, कार्यालयाची झडती घेऊन कागदपत्रे जप्त

author img

By

Published : Nov 17, 2021, 5:27 PM IST

रझा अकॅडमीच्या कार्यालयावर (Raza academy) शहर विभागाच्या पोलीस अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी छापा टाकून (Police raid Raza Academy office) झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांना आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

Police raid Raza Academy office
रझा अकॅडमी इमरान रिझवी अटक

नाशिक - रझा अकॅडमीच्या कार्यालयावर (Raza academy) शहर विभागाच्या पोलीस अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी छापा टाकून (Police raid Raza Academy office) झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांना आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sp Sachin Patil) यांनी दिली. पोलिसांकडून झाडाझडती करताना या कार्यालयाचे छायाचित्रण करण्यात आले आहे. पोलिसांना मिळालेली साहित्ये आणि चित्रीकरण हे न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - inflation india 2021 : 30 टक्क्यांनी वाढणार लग्नसोहळ्यातील पंगतीचा खर्च!

मालेगाव दंगल (malegaon violence) प्रकरणानंतर पोलिसांनी रझा अकॅडमीचे इमरान रिझवी (Imran Rizvi) यांना अटक केली. पोलिसांच्या रडारवर आता अनेक संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. दगडफेकीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता चांगलीच कंबर कसली आहे, तर पोलीस उपमहानिरीक्षक बि.जी शेखर आणि जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील गेल्या चार दिवसांपासून मालेगावात तळ ठोकून असून, अनेक संघटना आणि राजकीय नेते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

हेही वाचा - DPDC चा निधी वितरणासाठी भुजबळांच्या अध्यक्षतेखाली पाच आमदारांची समिती, खर्चावर ठेवणार नियंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.