ETV Bharat / city

व्यापार्‍यांच्या तोंडाला काळे फासणार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा - Onion growers Organization

केंद्रातील सरकारने परदेशातून कांदा आयातीचा निर्णयाने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले असून सरकारने तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना कांदा आयातदार अडते व व्यापार्‍यांच्या तोंडाला काळे फासेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

व्यापार्‍यांच्या तोंडाला काळे फासणार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा

author img

By

Published : Nov 12, 2021, 8:34 AM IST

नाशिक - केंद्रातील सरकारने परदेशातून कांदा आयातीचा निर्णयाने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले असून सरकारने तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना कांदा आयातदार अडते व व्यापार्‍यांच्या तोंडाला काळे फासेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने इराण, तुर्की, अफगाणिस्थानसह इतर देशातील कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे.

व्यापार्‍यांच्या तोंडाला काळे फासणार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा
बोगस बियाणे, प्रतिकुल हवामान, अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी सदृश्य पावसाने खरिपाच्या लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. आता शिल्लक उन्हाळी कांद्यासह नवीन लाल कांद्याचेही बाजार भाव वाढण्यास सुरुवात होताच केंद्र सरकारने इराण, तुर्की, अफगानिस्थानसह इतर देशातील कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील काही आयातदारांनी कांदा आयात केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या कांद्याला भाव कमी मिळत असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले आहे.कांदा उत्पादक शेतकरी अशा आयातदार, अडते, आणि व्यापारी यांचा योग्य तो बंदोबस्त करतील

शेतकऱ्यांचा कांदा ५० रुपये प्रति किलोऐवजी सरासरी २२ ते २५ रूपये बाजार भाव मिळत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मुंबई आणि महाराष्ट्रातील ज्या-ज्या आयातदार अडते व्यापारी यांनी परदेशी कांदा आयात केला आहे त्या-त्या कांदा उत्पादक शेतकरी विरोधी व्यापाऱ्यांची (संपूर्ण महाराष्ट्रातील) यादि, नाव, गाळानंबर, मोबाईल नंबर तसेच फोटो सर्व महाराष्ट्रात फेसबुक ग्रुप व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कांदा उत्पादक शेतकरी अशा आयातदार, अडते, आणि व्यापारी यांचा योग्य तो बंदोबस्त करतील आणि भविष्यात त्यांना एकही कांदा उत्पादक शेतकरी कांदा देणार नाही. याची सर्व आयातदार, अडते आणि व्यापारी यांनी नोंद घ्यावी असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.