ETV Bharat / city

ओबीसी समाजाचे गुरुवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन.. - नाशिकमध्ये इतर मागासवर्गीयांचे रास्ता रोको

न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द ठरवल्याने ते पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसी समाज उद्या (गुरुवार) जिल्हासह राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार

obc agitation
obc agitation
author img

By

Published : Jun 16, 2021, 3:14 PM IST

Updated : Jun 16, 2021, 3:24 PM IST

नाशिक - न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द ठरवल्याने ते पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसी समाज उद्या (गुरुवार) जिल्हासह राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले आहे.

राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना देखील आता आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर उद्यापासून नाशिक सह संपूर्ण राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आज भुजबळ फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे.

ओबीसींचे राज्यभर रास्ता रोको आंदोलन

नाशिकच्या द्वारका परिसरात होणार आंदोलन -

समता परिषदेच्या भुजबळ फार्म येथे झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या सकाळी नाशिकच्या द्वारका परिसरात रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ न्यायालयीन लढाई लढणार, तर आम्ही रस्त्यावर लढणार असे खैरे यांनी सांगितले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटना आक्रमक झालेल्या असताना दुसरीकडे ओबीसी संघटना देखील राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर रस्त्यावर उतरणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार आहे..

ओबीसींच्या विविध न्याय मागण्यांसाठी समता परिषद उतरणार रस्त्यावर..

ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे.

Last Updated : Jun 16, 2021, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.