ETV Bharat / city

नाशिक: कोरोनाने लक्षण बदलल्याने वाढला रेमडेसीवीरचा वापर

author img

By

Published : Apr 13, 2021, 3:06 AM IST

Updated : Apr 13, 2021, 3:22 AM IST

कोरोनाबाधित रुग्णांवर अँटी व्हायरल ड्रग रेमडेसिव्हेरचा अत्यंत अल्प असा परिणाम दिसून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Remdesivir
रेमडेसीवीरचा वापर

नाशिक- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणुचे लक्षणे आणि गुणधर्म बदलली आहेत. त्यामुळे रुग्णाचा एचआरसीटी स्कोर कमी असला किंवा ऑक्सिजन पातळी कमी झाली तर रुग्णांना रेमडेसिव्हेर इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे मत नाशिकचे डॉ. संजय धुर्जंड यांनी व्यक्त केले. रेमडेसिवीर मिळाले की रुग्ण 100 टक्के बरा होणार आणि मिळाले नाही की मृत्यु अटळ अशी वस्तुस्थिती अजिबात नसल्याचे जिल्हाधिकारी प्रशासनाने म्हटले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर अँटी व्हायरल ड्रग रेमडेसिव्हेरचा अत्यंत अल्प असा परिणाम दिसून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज 4 ते 5 हजार नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणुचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे.

कोरोनाने लक्षण बदलल्याने वाढला रेमडेसीवीरचा वापर

हेही वाचा-रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी चौघांना अटक; पुण्यात इंजेक्शनची रिटेल विक्री बंद

रेमडेसिवीरचा वाढला वापर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही जणांना पॉझिटीव्ह झाल्यानंतर उशिराने लक्षण जाणवत आहेत. तसेच सुरवातीला एचआरसिटीचा स्कोर 15 पुढे झाल्यावर रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात होते. मात्र आता 5 किंवा त्यापेक्षा अधिक एचआरसीटीचा स्कोर आला की त्यासोबत ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर रेमडेसिवीर दिले जात आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे.

हेही वाचा-'रेमडेसिवीर इंजेक्शन' मिळत नसल्यामुळे कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक हतबल, 'व्हिडिओ व्हायरल'

रेमडेसिवीरचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी-
ऑक्टोबर 2020 नंतर एप्रिल 2021 पर्यंत राज्यामध्ये कोरोनाबधितांचा आकडा बऱ्यापैकी खाली आला होता. कोरोनाची दुसरी लाट एवढ्या तीव्रतेने येईल येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांनीही तसा अंदाज नव्हता. मात्र मार्च 2021 नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. रोज हजारो रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. अशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणू लागला आहे. अन्न व औषध प्रशासन यांनी रेमडेसिवीरबाबत काही निर्बंध घातले आहेत. हॉस्पिटलमधून मागणी झाल्यावर रुग्णांची परिस्थिती बघून त्यांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. संजय धुर्जंड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-भाजप महाराष्ट्रासाठी देणार 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन

रेमडेसिवीर काही अंशी गुणकारी-
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासामध्ये रेमडेसिवीर कोरोनावरील उपचारांमध्ये केवळ काही अंशी गुणकारी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रेमडेसिवीर मिळाले की रुग्ण 100 टक्के बरा होणार आणि मिळाले नाही की मृत्यु अटळ अशी वस्तुस्थिती अजिबात नाही. परंतु ते मिळत नाही या हतबलतेमुळे मानसिक आघात होऊन बरेच जण खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या औषधाचा नेमका उपयोग कधी कसा व कितपत आहे, हे सर्वांना समजणे आवश्यक आहे. सर्व डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना याबाबत वस्तुस्थिती अवगत करून देणे अभिप्रेत असल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

केंद्राकडून रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी-
देशातील कोरोनाचा कहर जलदगतीने वाढत आहे. कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसीवीर या औषधाची मागणीही वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे औषध मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर अनेक ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होत असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

Last Updated : Apr 13, 2021, 3:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.