नाशिक - यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला शनिवारी (दि. 8 ऑक्टोबर)रोजी अपघात झाला. या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्यासह मृतांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करणार आहे असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच, ब्लॅकस्पॉट बाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देशही केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण (Dr. Bharti Pawar) राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ब्लॅकस्पॉट असणाऱ्या ठिकाणी तात्काळ सुधारणा कराव्यात अशा सुचानाही दिल्या आहेत. डॉ. भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करण्यासाठी भेट दिली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
नियमांचे काटेकोरपणे पालन - रस्ता सुरक्षेसाठी संबंधित विभागाकडून सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या व समितीच्या माध्यमातून नियमांची सातत्याने जनजागृती करण्यात येत असते. (government will help Nashik Road accident victims) त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ब्लॅकस्पॉट असणाऱ्या ठिकाणी तात्काळ सुधारणा कराव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील दिले आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत वेळोवेळी याबाबत काळजी घेण्यात येत आहे. खाजगी बस कंपन्यांनी रस्ता सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असेही डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
मानसिक समुपदेशान - योगविद्या व मेडिटेशनच्या माध्यमातून तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्यावर्षी निधी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार मानसिक रुग्णांच्या मदतीसाठी केंद्र सरकार प्रत्येक राज्यासोबत काम करीत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानसिक समुपदेशानाकरिता डॉक्टरांची टिम उपलब्ध आहे. मानसिक रुग्णांचे प्रमाण कोरोना महामारीनंतर वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्याचे दिसते असही त्यांनी सांगितले आहे.
मानसिक आरोग्य दिन - या मानसिक तणावातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होणे, रुग्णांना समुपदेशन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच, आपल्या देशाकडे योग विद्या व मेडिटेशनच्या बाबतीत जागतिकपातळीवर आदर्श म्हणून पाहिले जाते. योगविद्या व मेडिटेशनच्या माध्यमातून तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले राहणे ही सामुहिक जबाबदारी आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले राहिल्यास समाजाचा विकास देखील चांगल्या पद्धतीने होत असल्याने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्याने प्रत्येकाचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहील यासाठी प्रयत्न करावेत, असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले आहे.