ETV Bharat / city

Nana Patole Criticized BJP : 'भाजपने सांगावे मलईदार खाते कोणते' ?- नाना पटोले यांची भाजपवर टीका - strongly criticized

Nana Patole Criticized BJP : ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेतलेल्या कारवाई ही सुडबुध्दीने असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांच्यावरील आरोप खोटे असून इंग्रज ज्या पध्दतीने दडपशाही करायचे. त्याप्रमाणे केंद्र सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा गैरवापर सुरु असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole Criticized BJP
Nana Patole Criticized BJP
author img

By

Published : Aug 1, 2022, 9:24 AM IST

नाशिक - गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मलाईदार खाती हवे असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे मलईदार खाते कोणते यांचा अर्थ भाजपने महाराष्ट्राला सांगावा, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole Criticized BJP

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते भाजपात - तुपसाखरे लाॅन्स येथे काॅग्रेस मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेतलेल्या कारवाई ही सुडबुध्दीने असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांच्यावरील आरोप खोटे असून इंग्रज ज्या पध्दतीने दडपशाही करायचे. त्याप्रमाणे केंद्र सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा गैरवापर सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

राज्यात 'ईडी' चे सरकार असल्याची कबुली - राज्यपालांनी मुंबई बद्दल जे वक्तव्य केले, त्यात लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. लोकांमधील चीड डायव्हर्ट करण्यासाठी राऊत यांच्यावर कारवाई झाली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ते भाजपात गेल्यावर कारवाईचे काय झाले हे भाजपने सांगावे. त्यांचे नेमके कोणते शुध्दीकरण केले आहे. याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच राज्यात 'ईडी' चे सरकार असल्याची कबुली विधानसभेत फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्ष ठेवायची असा टोला लगावत देशातील जनता या एक दिवस सत्तेतून हद्दपार करेल, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

नाना पटोले यांची भाजपवर टीका - सगळ्यांना मंत्री व्हायचे आहे. पंरतु, कोर्टाच्या निकालामुळे थांबलं आहे. अर्जुन खोतकर म्हंटले होते की मी नाईलाजास्तव चाललो आहे, याचा उद्रेक होणार, याचे परिणाम केंद्र सरकारलाही भोगावे लागणार आहे. झारखंडचे अनुपसिंग नावाच्या आमच्या आमदारांनी पोलिसांत तक्रार केली आहे. झारखंड सरकार ते पाडायला निघाले आहे. पैशांची किती ऑफर आली ते टीव्हीवर चालू आहे. आसामला जे आमदार गेले होते, त्यातील काही आले तर ५० कोटींचा रेट चाली असल्याची चर्चा होती. भाजपकडे एवढा पैसे कुठून आला उद्या खासदारांना ही विकत घ्यायचे काम करतील, असे नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे.

हेही वाचा - ED Arrested Sanjay Raut : संजय राऊत यांना 16 तासाच्या मॅराथॉन चौकशीनंतर ईडीकडून मध्यरात्री अटक

हेही वाचा - Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना आज सकाळी साडेअकरा वाजता पीएमएलए न्यायालयात करण्यात येणार हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.