ETV Bharat / city

Female Birth Declining In Nashik : नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर घसरला, 344 सोनोग्राफी केंद्राची मनपा तपासणी करणार

काही महिन्यांपासून नाशिक शहरात मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने यांची गंभीर दखल घेत (Nashik as female Birth is declining) आता गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील 344 सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. (Gender equality in India) अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.

(फाईल फोटो)
(फाईल फोटो)
author img

By

Published : Dec 24, 2021, 10:03 AM IST

नाशिक - नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. याची आता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गंभीर दखल घेत गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र कायद्याची काटेकोर (Female Birth Declining In Nashik) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील 344 सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात येणार असून यासाठी 30 पथके तैनात करण्यात आली आहेत.

आता शहरातील 344 सोनोग्राफी केंद्राची 30 पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रात काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणत स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे प्रकार समोर आले होते. यासोबत आता बेकायदेशीररित्या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. (India fertility rate drops below ) आता शहरातील 344 सोनोग्राफी केंद्राची 30 पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा तपासणी अहवाल 15 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी पथकांना दिले आहेत.

आता पर्यंत 12 सोनोग्राफी सील

नाशिक शहरात 344 सोनोग्राफी केंद्राची नोंदी असल्यातरी त्यापैकी 322 सोनोग्राफी केंद्र प्रत्यक्षात सुरू आहेत. यातील 10 केंद्र तात्पुरते बंद आहेत. तर, 12 सोनोग्राफी केंद्रात लिंग निदान होत (Women Empowerment in India) असल्याच्या तक्रारीवरून सील करण्यात आली आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीतील सोनोग्राफी केंद्राची त्रेमासिक तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, मध्यंतरीच्या कोरोनामुळे अशी तपासणी करण्यात खंड पडला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने पथके नेमून सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली जाणार आहे.

स्त्री-पुरुष समानतेमध्ये भारताचे स्थान काय आहे ?

महिला सक्षमीकरणाच्या कितीही टिमक्या केंद्र सरकार वाजवत असले, तरी भारतातील स्त्री-पुरुष समानता दर दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे समोर येत आहे. जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेली नवीन आकडेवारी पाहता, आपण खरंच देशातील महिलांसाठी काही करतोय का असा प्रश्न उपस्थित होतो.

१५६ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक हा १४०वा

जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत भारत २८ स्थानांनी खाली घसरला आहे. १५६ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक हा १४०वा आहे. २०२० साली या यादीमध्ये देश ११२व्या स्थानावर होता.

बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानही पुढे..

या यादीमध्ये बांगलादेश (५६), भूतान (१३०), नेपाळ (१०६) आणि श्रीलंका (११६) हे देशाचे लहान लहान शेजारीही आपल्याहून वरच्या स्थानावर आहेत. नाही म्हणायला पाकिस्तान (१५३) आणि अफगाणिस्तान (१५६) हे दोन देश आपल्या खाली आहेत, हाच काय तो दिलासा.

महिलांना सर्वात कमी पगार मिळणाऱ्या दहा देशांमध्ये भारत..

या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात पुरुषांना मिळणाऱ्या पगारापेक्षा त्याच कामासाठी महिलांना मिळणारा पगार हा पाच पटींनी कमी आहे. जगात महिलांना सर्वात कमी पगार मिळणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. यासाठी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता नसणे, त्यांना आर्थिक बाबींमध्ये पुढाकार न घेऊ देणे, त्यांना राजकीय बाबींमध्ये पुढाकार घेऊ न देणे आणि नोकरीच्या कमी संधी उपलब्ध असणे या गोष्टी कारणीभूत आहेत.

साक्षरतेत महिला पुढे; मात्र पुरुष अगदीच मागे..

इतर बाबतीत महिलांना पुढाकार घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली नसली, तरी शिक्षणाच्या बाबतीत महिलांना मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळाले आहे. त्यामुळेच साक्षरतेत महिला पुरुषांपेक्षा अगदीच पुढे असल्याचे दिसून येत आहे. देशात पुरुष साक्षरता प्रमाण हे १७.६ टक्के आहे, तर महिला साक्षरता प्रमाण हे त्याच्या दुप्पट म्हणजेच ३४.२ टक्के असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - Shakti Bill In Assembly 2021 : शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर; या कायद्याने काय होणार? वाचा..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.