ETV Bharat / city

Rape Of Mother In Law: नाशकात मावस जावयाचा सासूवरच बलात्कार - अमरावती येथेही

वडील वारल्यामुळे नाशिक येथे (Nashik) अंत्यविधीसाठी आलेल्या (Arrived for the funeral) महिलेवर मावस जावयाने साडीचोळी करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन वारंवार बलात्कार (Frequent rape) केल्याची घटना भारतनगर परिसरात उघडकीस आली आहे.अमरावती येथेही (At Amravati) पीडितेच्या घरी जाऊन धमकावत त्याने असेच कृत्य वेळोवेळी केल्याचे समोर आले आहे.

Rape Of Mother In Law
सासूवरच बलात्कार
author img

By

Published : Dec 24, 2021, 5:12 PM IST

नाशिक: येथील मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित नितीन आशु वाणी (३५) रा. भारतनगर, मुळ रा. कोयाळी, ता. रिसोड, जि. वाशिम याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारी नुसार, त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी त्या सप्टेंबर २०२१ ला नाशिकला आल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपीने पीडितेस साडीचोळी करण्याच्या बहाण्याने भारतनगर येथील घरी नेले. त्या घरात झोपलेल्या असताना नितीनने मध्यरात्री पीडितेचा गळा दाबून विषाची बाटली दाखवून दमदाटी करून अत्याचार केला. त्यानंतर एक ऑक्टोबरला नाशिकमधील एका हॉटेलमध्ये नेत पीडितेचे छायाचित्र दाखवून अत्याचार केला. त्यानंतर १० नोव्हेंबरला अमरावती येथे पीडितेच्या घरी जाऊन धमकावत पुन्हा अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला. याप्रकरणी पीडितेने अमरावती येथील नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात सुरुवातीस फिर्याद दाखल केली हाेती. मात्र हा गुन्हा मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तेथून हा गुन्हा मुंबईनाका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.