ETV Bharat / city

Police Recruitment : पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती - उपमुख्यमंत्री

author img

By

Published : Apr 24, 2022, 3:34 PM IST

गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलीसांच्या घरांसाठी 737 कोटी रुपयांची तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलिसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Minister Ajit Pawar ) म्हणाले.

छायाचित्र
छायाचित्र

नाशिक - पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार ( Police Recruitment ) असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होताना खात्रीने पोलीस उपनिरिक्षक होईल, अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Minister Ajit Pawar ) यांनी दिली. राज्यातील जुन्या पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात अला आहे. त्यातील 87 पोलीस ठाण्याच्या बांधकामांना सुरुवातही झाली आहे. महिला पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून पोलीस दलासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात ( Convocation Ceremony ) बोलत होते. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलीसांच्या घरांसाठी 737 कोटी रुपयांची तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलीसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या पोलीस दलाला गौरवशाली इतिहास आहे. पंजाबमधील दहशतवाद मोडून काढणाऱ्या पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो साहेबांपासून, शहिद तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या शूर, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा जगात असलेला लौकिक तुम्ही सर्वजण टिकवून महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाढवाल, पोलीस दलाचे सामर्थ्य सिद्ध करुन दाखवाल, याबाबत शंका नाही. आपली बांधिलकी ही भारतीय राज्यघटना, नियम व कायद्यांशी असली पाहिजे. जात-पात, धर्म-पंथ, वैचारिक बांधिलकी, राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारसरणी या गोष्टींना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्थान असणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच वैयक्तिक आस्थाच पालन घराच्या उंबरठ्याच्या आत करावं, वैयक्तिक आस्थांचे प्रदर्शन टाळल्यास यातूनच देश पुढे जाण्यास मदत होणार आहे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना केले आहे.

मागील वर्षी 9 ऑगस्टला 30 कोटी 60 लाख रुपये खर्च करुन पोलीस अकादमीत बांधलेल्या सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, नुतन नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले होते. यापुढच्या काळातही, महाराष्ट्र पोलीसांच्या प्रशिक्षणाचा दर्जा वाढवून दल अधिक सक्षम, समर्थ करण्यासाठी, पोलीस अकादमीत अत्याधुनिक प्रशिक्षण इमारतीसाठी 7 ते 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्‍यासोबतच आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली आहे.

सत्र 119 च्या तुकडीतील 12 महिला अधिकाऱ्यांसह सर्व 309 अधिकारी या सन्मानासाठी तितकेच सक्षम, पात्र आहे. या तुकडीतला प्रत्येक अधिकारी भविष्यकाळात महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून राज्याची चांगली सेवा करेल, असा विश्वास आहे. तसेच राज्यातील अनेक तरुण दरवर्षी एमपीएससीची तयारी करत मेहनत घेऊन परीक्षा देतात. पोलिसांची वर्दी अंगावर घालण्याचे या तरुणांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. त्यापैकी काहींनाच यश मिळून दीक्षांत समारंभापर्यंत पोहचण्याच भाग्य फारच थोड्या जणांच्या वाट्याला येते. आज तुम्हा 322 जणांच्या वाट्याला ते भाग्य आले आहे. याचा तुमच्या कुटुंबियांप्रमाणेच आम्हालाही मनापासून आनंद आहे. आपण सर्व पोलीस दलातील सेवा, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून उत्तम पोलीस अधिकारी, एक चांगला माणूस म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण कराल. तसेच या भावी अधिकाऱ्यांच्या यशात, अकादमीच्या प्रशिक्षकांच्या योगदानाचाही मोठा वाटा असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

पोलिसांच्या गणवेशाची प्रतिष्ठा अन् मर्यादा नेहमी सर्वोच्च ठेवावी - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - महाराष्ट्र पोलीस दलाला एक गौरवशाली इतिहास आहे. आपल्या सर्वांवर एक आधुनिक, प्रभावी आणि संवेदनशील पोलीस सेवा व्यवस्था निर्माण करण्याची खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच आता तुम्हाला ही नवी सुरुवात संकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून पोलीसांच्या गणवेशाची प्रतिष्ठा आणि मर्यादा नेहमी सर्वोच्च स्थानी ठेवत भविष्याची वाटचाल करायची आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी यावेळी केले आहे.

खाकी वर्दीची प्रतिष्ठा आपण जपली आणि उंचावत नेली तर स्मार्ट पोलिसिंग काय असते हे आपण साऱ्या देशाला अभिमानाने दाखवून देऊ शकतो. नागरिकांशी वागताना आपली वर्तणूक सौजन्यशील असली पाहिजे त्यांना यथायोग्य सन्मान द्या त्यांच्या तक्रारीची दखल घ्या. जनतेचे रक्षक म्हणून समाजात वावरताना पीडितांना आणि वंचितांना न्याय देण्याचे कार्य करावे. तुमच्या सकारात्मक वर्तणुकीने खाकी वर्दीबद्दल जनसामान्यांचा आदर भाव वाढलेला दिसेल. आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये अनेक मोहाचे क्षण येतील त्याला बळी पडू नका भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊ नका. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाची दार आपल्याला खुली झाली आहेत हे ज्ञान आत्मसात करा व त्यासाठी स्वतःला अपडेट करत रहा व स्वतःला तंदुरुस्त ठेवा.

  • हे आहेत सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी
  • ️स्व. यशवंतराव चव्हाण वर्ड कप बेस्ट ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच आणि बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच सोर्ड ऑफ रिव्हॉलवर : गणेश वसंत चव्हाण
  • अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑल राऊंड वुमन कॅडेट ऑफ द बॅच : तेजश्री गौतम म्हैसाळे
  • सेकंड बेस्ट ट्रेनि ऑफ द बॅच : विशाल एकनाथ मिंढे
  • ️बेस्ट कॅडेट इन स्टडीज सिल्वर बॅटेन पुरस्कार : प्रतापसिंग नारायण डोंगरे

हेही वाचा - Dilip Walse Patil : राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी प्रयत्न होत आहेत - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.