ETV Bharat / city

Bhujbal Letter To CM : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांदा बाजार भावातील घसरण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्याकडे केली आहे. कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे असे पत्र त्यानी मुख्यमंत्र्याना लिहले आहे.

Bhujbal Letter To CM
छगन भुजबळ
author img

By

Published : Aug 5, 2022, 9:14 PM IST

Updated : Aug 5, 2022, 9:38 PM IST

नाशिक - कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी ( onion producing farmers ) अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा बाजार भावातील घसरण थांबविण्यासाठी राज्यशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा - छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य असुन भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 33 टक्के वाटा ( Maharashtra's share in onion production is 33 percent ) आहे. महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे,सोलापुर, सातारा, अहमदनगर,धुळे, बुलढाणा जळगांव इ. जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा आहे.

नाशिक जिल्ह्यात कांद्याची खरेदी - विक्रीसाठी माझ्या मतदारसंघातील लासलगांव बाजार समिती ( Lasalgaon Market Committee ) ही आशिया खंडात प्रसिध्द अशी बाजारपेठ आहे. येथे विक्रीस येणाऱ्या एकुण आवकेपैकी 85 ते 90 टक्के आवक ही कांदा ह्या शेतीमालाची असते. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार, औरंगाबाद या सहा जिल्ह्यातून विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी 70 ते 80 टक्के कांदा हा निर्यातयोग्य असतो.नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकरी बांधवांचाच शेतीमाल विक्रीस येत असल्याचे म्हटले आहे.

आंदोलन होण्याची शक्यता.. सद्यस्थितीत रब्बी (उन्हाळ) कांद्याची विक्री सर्वसाधारण सरासरी रू. 800 /- प्रती क्विंटलप्रमाणे होत आहे. गेल्या 15 दिवसातील कांदा बाजारभावाचा विचार करता बाजारभाव स्थिर असल्याने सध्या मिळत असलेल्या बाजारभावात येथील शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झालेले आहे. तसेच यावर्षी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांसह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी घटलेली आहे. त्यातच बांग्लादेशने कांदा आयातीवर निर्बंध ( Onion import restrictions in Bangladesh ) टाकल्याने श्रीलंकेत आर्थिक परीस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे. भारताच्या या दोन्ही प्रमुख आयातदार देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत नसल्याने मागणी अभावी कांद्याची बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. कांदा बाजारभावात घसरण ( Fall in onion market price ) अशाच प्रकारे सुरू राहील्यास केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्वतंत्र रेल्वे द्यावी.. सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत असलेला रब्बी (उन्हाळ) कांदा जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात निर्यात होणेसाठी कांदा निर्यातीस चालना देणेकामी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली 10 % कांदा निर्यात प्रोत्साहन योजना 11 जून 2019 पासुन बंद केलेली असल्याने सदरची योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : 'बाळासाहेबांनी शिकवलं रडायचं नाही, सत्यासाठी...'; संजय राऊतांचे विरोधकांना पत्र

निर्यात पुर्ववत सुरू करा.. बांग्लादेशला कांदा निर्यात पुर्ववत सुरू होणेसाठी प्रयत्न करून तेथे रेल्वेद्वारे कांदा पाठविणेसाठी असलेली कोटा सिस्टीम संपुष्टात आणावी. बांग्लादेशसाठी निर्यातदारांना कांदा पाहिजे त्या प्रमाणात वेळेत पाठविण्यासाठी किसान रेल किंवा BCN च्या हाफ रॅक देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा. सध्या रेल्वेद्वारे कांदा पाठविणेसाठी BCN रॅक उपलब्ध करून दिल्या जातात. सदर रॅकद्वारे कांदा वाहतुकीसाठी साधारणतः 5 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो. त्याऐवजी येथील कांदा निर्यातदारांना किसान रेल अथवा त्या धर्तीवर व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र रेल उपलब्ध करून दिल्यास सदरचा माल 48 ते 60 तासांमध्ये पोहोचविला जाईल. वेळ, भाडेदरातील बचतीमुळे व्यापारी वर्ग अधिकचा मोबदला शेतकरी बांधवांना भाववाढीसाठी देऊ शकतील.

वाहतूक अनुदान - देशांतर्गत किंवा परदेशात कांदा पाठविणाऱ्या खरेदीदारांना ( Transport Subsidy ) दिल्यास माल वाहतुक दरात अनुदान मिळत असल्याने कांदा खरेदीदार जास्तीत जास्त कांदा देशांतर्गत परदेशात पाठविणेसाठी प्रयत्न करतील. व्यापारी वर्गास कांदा निर्यात करण्यासाठी लवकर कंटेनर मिळत नाही. त्यासाठी 8 ते 10 दिवस प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे कांदा निर्यातीस अडथळा निर्माण होत असल्याने त्वरीत कंटेनर उपलब्ध करावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

हेही वाचा - Fire Broke Out At Wadia Hospital : मुंबईतील वाडिया हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला आग..

Last Updated : Aug 5, 2022, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.