ETV Bharat / city

दुबे एन्काऊंटर; तो कसाही मरू द्या, भुजबळांची प्रतिक्रिया - minister chhagan bhujbal on dube encounter

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेबद्दल प्रेम वाटावे अशी परिस्थिती नाही. त्याने पोलिसांना मारले हे चुकीचेच आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

minister chhagan bhujbal
छगन भुजबळ पालकमंत्री, नाशिक
author img

By

Published : Jul 10, 2020, 5:09 PM IST

नाशिक - उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेबद्दल प्रेम वाटावे अशी परिस्थिती नाही. त्याने पोलिसांना मारले हे चुकीचेच आहे. तो कशाही पद्धतीने मरू द्या त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी दुबे एन्काऊंटरचे समर्थन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.

छगन भुजबळ पालकमंत्री, नाशिक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्‍यावरही टीका केली आहे. फडणवीस राज्यात दौरा करतात ही चांगली बाब आहे. मात्र, त्यांचे सरकार असताना विरोधी पक्षाच्या दौर्‍यात शासकीय अधिकार्‍यांनी जाऊ नये, असा आदेश काढला होता, अशी आठवण त्यांनी फडणवीस यांना करुन दिली.

इगतपुरीच्या एसएमबीटी कॉलेजमध्ये १०० बेड राखीव ठेवणार

सर्व संपादीत रुग्णालयांचा खर्च सरकार करणार आहे. औषध व ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी ६ कोटींची तरतूद केली आहे. टेस्टिंग कमी केल्या तर आकडा कमी व टेस्टिंग वाढवली तर आकडा वाढतो. खासगी रुग्णालयात जादा बिल घेतल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा भुजबळांनी दिला.

दरम्यान, खासगी शाळा ऑनलाइन शिक्षण प्रणाली राबवत शिक्षणासाठी जादा पैसे घेत असल्याच्या अनेक पालकांनी तक्रार केल्या आहेत. याबाबत भुजबळ यांनी सांगितले की, खासगी शाळांनाही खर्च आहे. शिक्षण आॉनलाइन असले तरी पैसा लागतो. कर्ज घेऊन शुल्क भरा अशी कोणतीही शाळा सांगत नाही, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.