ETV Bharat / city

नाशकात जनता कर्फ्यू अधिक कडक करणार; विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे होणार दाखल

author img

By

Published : Jun 30, 2020, 7:50 PM IST

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत जिल्हा रूग्णालयात डॉक्टर्स तसेच पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. मध्यंतरी भरती प्रक्रियाही राबवली गेली. मात्र ,दोनशे डॉक्टरांपैकी अवघे 30 डॉक्टर्स रूजू झाले. त्यामुळे आता रूग्णांच्या उपचारासाठी शहरातील खासगी डॉक्टर्स तसेच तज्ञ डॉक्टरांची सेवाही अधिग्रहीत करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

janata curfew will be strictly implemented in nashik
नाशकात जनता कर्फ्यू अधिक कडक करणार

नाशिक - शहरातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता यापुढे सायंकाळी 7 वाजेनंतर विनाकारण घराबाहेर पडणार्‍या नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी संसर्ग लक्षात घेता ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता राज्य शासनाने 31 जूलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत शहरात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभुमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बोलतांना भुजबळ म्हणाले, की नाशिक जिल्ह्यात 4 हजाराहून अधिक रूग्ण आढळले आहेत. यापैकी 103 रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 236 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 99 मृत्यू नाशिक शहरात झाले. यातील 136 लोकांचे वयोमान हे 40 ते 45 वर्ष वयोगटातील असून तरूणांचा मृत्युदर 60 टक्के असल्याने ही गंभीर बाब आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. शहरातील व्यापारी संघटनांनीही सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 5 वाजेनंतर आपोआपच गर्दी कमी होण्यास मदत होईल, भुजबळ म्हणाले.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत जिल्हा रूग्णालयात डॉक्टर्स तसेच पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. मध्यंतरी भरती प्रक्रियाही राबवली गेली. मात्र ,दोनशे डॉक्टरांपैकी अवघे 30 डॉक्टर्स रूजू झाले. त्यामुळे आता रूग्णांच्या उपचारासाठी शहरातील खासगी डॉक्टर्स तसेच तज्ञ डॉक्टरांची सेवाही अधिग्रहीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या निर्बंधांचे उल्लंघन होतांना दिसते जसे, दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी असताना तीन-तीन जण प्रवास करताना दिसतात. यापुढे अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल. शिवाय, गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचे भुजबळांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे उपस्थित होते.

खासगी रूग्णालयाच्या मनमानीला चाप -
खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या रूग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारींबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, यापुढे महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून खासगी रूग्णालयांचे संचलन केले जाईल. या रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांसाठी राखीव बेड कोणत्या रूग्णांना द्यायचे, याचा निर्णय आता प्रशासन घेईल. तसेच प्रत्येक खासगी रूग्णालयात महापालिकेमार्फत एक संपर्क अधिकारी नियुक्त केला जाईल. रूग्ण किंवा नातेवाईकांनी या कर्मचार्‍यांशी संपर्क करून आवश्यक ती मदत घेण्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. कोरोनाची लढाई आपल्या सर्वांना मिळून लढाईची आहे, त्यामुळे कृपया कारवाईची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.