ETV Bharat / city

Nashik Sahitya Sammelan : साहित्य संमेलनावेळी वाद झाला पाहिजे असा नियम झालाय का? - शरद पवार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ( All India Marathi Literary Meet In Nashik ) स्वातंत्रवीर सावरकर ( Vinayak Damodar Davarkar Nashik Sahitya Sammelan ) यांचे नावं का दिले नाही? अस म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Nashik Sahitya Sammelan ) यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. आता साहित्य संमेलन म्हणजे वाद झाला पाहिजे, असा नियम झाला आहे का? अशी खंत खासदार शरद पवार ( Sharad Pawar Nashik Sahitya Sammelan ) यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सत्कार करताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगण भुजबळ

author img

By

Published : Dec 6, 2021, 10:32 AM IST

Updated : Dec 6, 2021, 12:54 PM IST

नाशिक - अखिल भारतीय मराठी ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) साहित्य संमेलनाला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नावं का दिले नाही? ( literary ) अस म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. आता साहित्य संमेलन म्हणजे वाद झाला पाहिजे, असा नियम झाला आहे का? अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ( Sharad Pawar ) संमेलनाच्या समारोप प्रसंगी पवार उपस्थित होते तेव्हा ते बोलत होते.

सावरकरांच्या नावाला कोणी विरोध करू शकत नाही

नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी त्यांनी आपल्या काव्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्याग्रह मांडला आहे. ( Marathi Sahitya Sammelan ) सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला कोणी नाशिककर व महाराष्ट्रातील नागरिक विरोध करू शकत नाहीत. मात्र, काही लोक त्यावर वाद निर्माण करतात याची खंत आहे. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. कुसुमाग्रजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साहित्य संमेलनाला त्यांचे नाव दिले हे स्वागतार्ह आहे. ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) मराठी साहित्य संमेलनात त्यांचे मोलाचे योगदान दिले. ( Sahitya Sammelan ) त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी तात्यासाहेब यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे सांगत साहित्य संमेलन म्हटले की वाद निर्माण करणं ही परंपरा पडत आहे काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

साहित्य कुंभमेळा यशस्वी

आपल्याला नव्या पिढीतून रोबो घडवायचे नाहीत. माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि ते मातृभाषेतूनच जपलं जाऊ शकतं असा माझा विश्वास आहे. ( Marathi Sahitya Sammelan ) साहित्य रसिकांना माझी विनंती आहे की, त्यांनी मराठी भाषिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. संमेलनाच्या समारोप प्रसंगी नाशिकच्या गोदाकाठी हा साहित्य कुंभमेळा यशस्वीपणे आयोजित करणाऱ्या लोकहितवादी मंडळाचे, संमेलानाध्यक्षांचे तसेच सहभागी साहित्यिक व साहित्यप्रेमींचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो असही पवार यावेळी म्हणाले आहेत.

मराठी भाषेच्या संवर्धनात स्व. यशवंतराव चव्हाणांनी कष्ट घेतले

1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले पण अध्यापन क्षेत्रात मराठी भाषेचा प्रवास तसा खडतर राहिला. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्ये अस्तित्वात येत असताना भाषिक अस्मितेचा अंगार मुलत: होता. भाषावार राज्य निर्मितीनंतर राज्यांतर्गत भाषेची अभिवृद्धी होणे अपेक्षित होते. परंतु, तसे म्हणावे त्या वेगाने घडत नव्हते, पदवी परीक्षेला मराठी विषय पहिल्यांदा 1921 साली आला. ( Sharad Pawar Sahitya Sammelan ) मात्र, आपणास आश्चर्य वाटेल की मुंबई विद्यापीठात मराठी विभाग स्वातंत्र्यानंतर 22 वर्षांनंतर म्हणजे 1969-70 मध्ये सुरू झाला. मराठी भाषेच्या संवर्धनात स्व. यशवंतराव चव्हाणांनी मात्र अतिशय कष्ट घेतले. ह्या प्रसंगी त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करणे औचित्याचे आहे. ते स्वतः एक उत्तम लेखक तर होतेच पण साहित्यवाचनात त्यांची आजही कोणी बरोबरी करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने वाजवी किमतीत ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले

मराठी भाषेचा विकास केवळ साहित्यिक अंगाने होऊ नये तर मराठी भाषेच्या माध्यमातून वैज्ञानिक आविष्कार घडावेत अशी त्यांची पोटतिडिक होती. त्यांनी राज्यात स्वतंत्र भाषा संचालनालय स्थापन केले. शासन व्यवहार कोश निर्माण करण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या कारकीर्दीत राज्यात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ स्थापन झाले. महाराष्ट्र शासनाने वाजवी किमतीत ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले. ( Sharad Pawar ) महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पुस्तकांची निर्मिती करण्याचे मोलाचे काम केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश निर्मितीचे शिवधनुष्य उचलले. ह्या सर्व प्रयत्नांमुळे कोश निर्मितीत महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रंथनिर्मिती मंडळ आता बंद पडले आहे

यशवंतरावांच्या कालखंडात हे जोमाने चालणारे प्रयत्न नंतरच्या काळात थंड झाले. ग्रंथनिर्मिती मंडळ आता बंद पडले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडली याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आता आली आहे. राज्य मराठी भाषिकांचे राज्य म्हणून निर्माण झाले त्या राज्यात ममराठी भाषेचे नेमके काय झाले? आपण आपल्या भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी इतक्या वर्षात काय केले? आज मराठी भाषा नेमकी कुठे आहे? याचा लेखाजोखा मांडला जावा आणि मराठी भाषेच्या सर्वागिण वृद्धीसाठी राज्यशासनाने पुन्हा कार्यक्रम हाती घ्यावा असे मी आवाहन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक भागाची एक वेगळी भाषाशैली आहे

संगणकीय युगात माहितीचा विस्फोट झाला आहे. परकीय भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत प्रवेश करू लागले आहेत. परकीय भाषांमध्ये नवनवीन शब्दांची निर्मिती होत आहे. त्यामुळे सध्याचे शब्दकोश कालानुरूप सुधारित करणं महत्वाचे आहे. इतर भाषांमध्ये होतं ते काम वेगाने घडत आहे. आपणही से करावयास हवे. बहुजनांच्या भाषेला बोलीभाषेला साहित्यात व मराठी कोशात अधिकाधिक स्थान द्यावयास हवे. प्रारंभी समाजसुधारकांच्या लिखाणाला शब्दांना कोशकार स्थान देत नसत. ज्ञानकोशकार केतकरांवर देखील तशी टिपणी झाली होती. ज्योतीराव फुलेंच्या साहित्यातील शब्दांना कोशकारांनी दूर ठेवले होते. परंतु बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचूर, क्लिष्ट न राहता सोपी, ओघवती होते. आपण पाहातो की, संगणक अथवा इंटरनेटच्या जमान्यात कॅची वर्ड संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. दर दहा मैलाला भाषा बदलते असे म्हणतात. थोडक्यात प्रत्येक भागाची एक वेगळी भाषाशैली आहे. मला वाटते की, आपण आपल्या प्रमाण भाषेबद्दलचा दुराग्रह सोडून ह्या सर्व इतर शैलींना शब्दांना स्थान द्यावे. मराठी भाषा स्थानीक बोलीभाषांच्या बाबतीत समावेशक झाली तरच ती अधिक समृद्ध होईल असे माझे ठाम मत असल्याचे पवार यांनी म्हटलं.

इंग्रजीला पसंती दिली जाते

पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणता येईल का? याकडे लक्ष देणे व आधुनिकता आणण्यासाठी सातत्याने काम करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर माहितीच्या वेगवान जगात मराठी खूप मागे पडेल. तसेच पदवी-पदव्युत्तर लिखाणात मराठी भाषा कमी होत चालली आहे. यशवंतराव चव्हाणांना मराठी भाषेची वैज्ञानिक प्रांतात वृद्धी व्हावी अशी कळकळ होती. दहावीपर्यंत विज्ञानात मराठी भाषा आहे. परंतु पदवी व नंतरच्या अध्यापनात मराठी दिसत नाही. मराठी भाषेची पिछेहाट होण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी इंग्रजी भाषा महत्वाची ह्या समजामुळे शालेय शिक्षणासाठीसुद्धा मराठीपेक्षा इंग्रजी भाषेला पसंती दिली जाते हा धोका फार मोठा आहे. संख्येअभावी मराठी शाळा बंद होण्याइतपत गंभीर परिस्थिती आज निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे पदवी व नंतरचे विज्ञान वाणिज्य व इतर शिक्षण मराठीतून देण्याचा विचार व्हावा असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Sahitya Sammelan 2021 : संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

Last Updated : Dec 6, 2021, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.