नाशिक - जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप पक्ष आदेशाला धुडकावून लावत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका ठेवला आहे. यासाठी 27 नगरसेवकांविरोधात नाशिक विभागीय आयुक्तांकडे भाजपच्या गटनेत्यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन प्रकरणी 'एटीएस' फाईल करणार 'बी समरी', जाणून घ्या 'बी समरी' म्हणजे काय ?
भाजपच्या नगरसेवकांनी सेनेला मतदान केल्याने भाजपचा आक्रमक पवित्रा
जळगावच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्ष आदेशाला धुडकावून लावत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका ठेवत जवळपास 27 नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार जळगावचे मनपा भाजप गटनेते भरत बालानी यांनी या 27 नगरसेवकांविरोधात पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली आहे.
मनपा भाजप गटनेते भरत बालानी केली अपात्रतेची याचिका केली दाखल
जळगावच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली. यामध्ये भाजपच्या 27 नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे आणि उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. यामुळे आता पक्षाशी गद्दारी करणाऱ्या या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा हाती घेत याचिका दाखल केली आहे. यामुळे आता या नगरसेवकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - रेल्वेत रात्री मोबाइल, लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाहीत, या घटनेमुळे घेतला निर्णय