ETV Bharat / city

तज्ज्ञ व्यक्तींसह सव्यंसेवी व्यक्ती एकत्र आले तर पर्यावरणात शाश्वत विकास होईस- आदित्य ठाकरे - वर्ल्ड रिर्सोस इन्सिट्युट

तज्ज्ञ व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतल्यास निसर्गाची कमीत कमी हानी करून पर्यावरण पूरक शाश्वत विकास साधावा,असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. बोट क्लब येथे आयोजित नाशिक जिह्याची पर्यटन विषयक आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते.

बैठक
बैठक
author img

By

Published : Jan 29, 2022, 12:43 AM IST

नाशिक - नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या सामंजस्य करारावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाल्या आहेत. नाशिकचे हवामान पोषक राहण्यासाठी महानगरपालिका व वर्ल्ड रिर्सोस इन्सिट्युट यांच्यामध्ये नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

विवध समस्या तयार

शहरांचा विकास आराखडा करतांना स्थानिक नागरिक, तज्ज्ञ व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतल्यास निसर्गाची कमीत कमी हानी करून पर्यावरण पूरक शाश्वत विकास साधावा,असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. बोट क्लब येथे आयोजित नाशिक जिह्याची पर्यटन विषयक आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

महानगरपालिके मार्फत सौरऊर्जा हा चांगला प्रकल्प राबविण्यात येत आहे

यावेळी बोलतांना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, शुद्ध हवा आणि पाणी तसेच नागरिकांना चांगले जीवन देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण पूरक विकासाची कास धरणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी समान पातळीवर येवून काम करणे आवश्यक आहे.तसेच महानगरपालिके मार्फत सौरऊर्जा हा चांगला प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची नागरिकांना माहिती दिल्यास शहरातील विजेचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

झाडांचा,पाईप लाईनचा मॅपिंग मध्ये समावेश करावा

जिल्ह्यातील महापालिकेमार्फत जीआयएस मॅपिंग करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व झाडांचा त्यांच्या माहितीसह आणि त्यांच्या प्रकारासह या मॅपिंग मध्ये करण्यात यावा जेणेकरून त्यांची नोंद घेणे सोईचे होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जमिनीखालील पाईपलाईन व सांडपाण्याचे गटार यांचाही सर्वे करून या बाबींचा समावेश देखील या मॅपिंग मध्ये करावा जेणेकरून नवीन विकास आराखडा तयार करतांना नोंदी उपलब्ध होणार आहे.अशा सूचना यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहेत.

नाशिक शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार

शहरीकरणाचा विकास करतांना पर्यावरण व निसर्गाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. राज्यात पर्यटनाचा विकास होत आहे हा विकास करतांना सर्वांनी एकत्रितरीत्या येवून काम केल्यास पर्यावरणाचा समतोल साधता येणार आहे. यासाठी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्वोत्तपरीने मदत करण्यात येईल, ग्लोबल वार्मिंग व वातावरणीय बदलांचा अभ्यास करून विकासाचा आराखडा तयार करून शहरीकरणाचा विकास करणे आवश्यक आहे. विकासात्मक शहरीकरणाचा आराखडा तयार करतांना मूलभूत सोई सुविधांचा विचार आणि पर्यावरणाचा करून आराखडा तयार करावा असे प्रतिपादन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
झाडांची काळजी घ्यावी

महानगरपालिकेने सुरक्षित व सुंदर शहर निर्मितीसाठी स्पर्धेचे आयोजन केल्यास जलद गतीने जिल्ह्याचा विकास होणार आहे. शहरीकरण करतांना पुलांचे बांधकाम करतांना झाडांचे नुकसान होणार नाही याची महापालिकेने दक्षता घ्यावी,असे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी नाशिक शहराच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक मिलिंद बोरीकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - आज २७० एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; एकूण आकडा साडेसहा हजाराच्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.