ETV Bharat / city

कोरोनामुळे बालकामगारांचे प्रमाण वाढले, शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची गरज

कोरोनामुळे बालकामगारांचे प्रमाण वाढले आहे. यावेळी मुलांना कामावर पाठवू नका यासाठी देखील आम्ही पालकांमध्येसुद्धा जनजागृती करणार असल्याचे कामगार उप आयुक्त विकास माळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सागितले.

has been an increase in the number of child laborers during corona disease
कोरोनामुळे बालकामगारांचे प्रमाण वाढले, शाळा बाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची गरज
author img

By

Published : Jun 8, 2021, 5:16 PM IST

Updated : Jun 8, 2021, 7:59 PM IST

नाशिक - कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढले असून, यामुळे बालकामगारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची गरज निर्माण झाली असून राज्य सरकारने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनामुळे बालकामगारांचे प्रमाण वाढले, शाळा बाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची गरज

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फाटक सर्वसामान्य नागरिकांन सोबत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबाना देखील बसला आहे. हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक समस्याचा सामना करावा लागत आहे, त्यात मागील वर्षभरापासून शाळा देखील बंद असल्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी बालमजुरीकडे वळल्याचे चित्र आहे. घराची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक पालक देखील आपल्या मुलांना कामावर घेऊन जात आहेत.

बालमजूर वाढले -

कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका अल्पवयीन मुलांना देखील बसला आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा रोजगार गेल्याने आणि वर्षभरापासून शाळा बंद असल्याने अनेक मुले बालमजूरीकडे वळली आहेत. गेल्या वर्ष भरात 14 वर्षच्या आतील मुले घरकाम, ऊस तोडणी, वीट भट्टीवर, गाड्या धुणे, कचरा गोळा करणे, रस्त्यावर वस्तू विकणे अशा प्रकारचे काम करतांना आढळून आली आहेत.

ऑनलाइनची सुविधा नाही -

कोरोना काळात एकीकडे शाळा बंद असल्याने खासगी शाळांनी मुलांना ऑनलाइन शिक्षण देत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवले. दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महानगरपालिका आणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी मात्र ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले. विद्यार्थ्यांनकडे ऑनलाइन शिक्षणासाठीसाठी मोबाइल, इंटरनेट सारखी उपकरण नसल्याचे सांगत सरकारी शाळेतील शिक्षकांनी देखील आपली जबाबदारी झटकून टाकली. सरकारी शाळेतील शिक्षकांना सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे सोडून कोरोना बाधित रुग्णांची मोजणी करण्याच्या कामात व्यस्त केल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.

बालमजुरी करण्यास भाग पडल्यास पालकांवर कारवाई -

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला आहे, त्यामुळे घरातील अनेक मुले पालकांना शेतात किंवा घरात मदत करत आहेत. मात्र, घरच्या कामात मुलांनी मदत करण्यासाठी परवानगी आहे. मात्र, एखादे पालक मुलांना कंपनी अथवा उद्योगामध्ये कामावर पाठवत असतील तर तो कायद्याने गुन्हा आहे. अशा तक्रारप्राप्त झाल्या तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू, तसेच मुलांना कामावर पाठवू नका यासाठी देखील आम्ही पालकांमध्येसुद्धा जनजागृती करणार असल्याचे कामगार उप आयुक्त विकास माळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सागितले.

शैक्षणिक पालकत्व उपक्रम -

मी महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असून, कोरोनामुळे आर्थिक संकट आले असून मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना कामावर पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बा मजुरीचे प्रमाण वाढले आहे. बालमजुरीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रवाहापासून दूर जात आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. मुलांनी शिक्षणापासून दूर जाऊ नये यासाठी आम्ही दोघी शिक्षक मैत्रिणीनी पाच विद्याथीनीचे शैक्षणिक पालकत्व उपक्रम घेतले असून त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत आम्ही करणार आहोत. या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदर करावी असे आवाहन देखील आम्ही करत असल्याचे कुंदा शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना म्हटले आहे.

Last Updated : Jun 8, 2021, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.