नाशिक - जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने ओझर येथील लढाऊ विमान बांधणी आणि दुरुस्तीचा एचएएल कारखाना देखील 23 मेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र कारखाना बंद असल्याने कामगारांना जुलैमध्ये सुट्ट्या भरून द्यावा लागणार असल्याने कामगारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कामगारांची व्यवस्थापनाच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने ओझर येथील येथील एचएएल कामगारांना 12 मे रोजी पोलिसांनी अडवले आणि नाशिक व परिसरात राहणाऱ्या कामगारांना घरी पाठवले. त्यानंतर व्यवस्थापनाला जाग आली आणि 15 ते 23 मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व कामगारांना जुलै महिन्यात या सुट्ट्या भरून द्यावे लागणार असल्याने कामगारांनी व्यवस्थापनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहेत.
'व्यवस्थापनाशी चर्चा सुरू'
सुट्ट्या भरून देण्याबाबत कामगार संघटनेची व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे एचएएल कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'तौक्ते’ चक्रीवादळ गोवा-सिंधुदुर्गच्या दिशेने; गोव्यात एनडीआरएफ दाखल; मुंबईत वाऱ्यासह पाऊस
हेही वाचा - राजा तुपाशी, प्रजा उपाशी... भेंडवळच्या घटमांडणीचे वर्तविले भाकित