ETV Bharat / city

Girl Dead in Bus Accident Nashik : नाशकात बस अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू - nashik live news update

नाशिकच्या जुने सीबीएस परिसरात बस स्थानकातून निघालेल्या बसखाली एका विद्यार्थिनीचा मृत्यू ( Girl Dead in Bus Accident Nashik ) झाल्याची घटना घडली आहे. रस्ता ओलांडताना तिचा बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Girl Dead in Bus Accident Nashik
नाशकात बस अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू
author img

By

Published : Feb 11, 2022, 6:18 PM IST

नाशिक - नाशिकच्या जुने सीबीएस परिसरात बस स्थानकातून निघालेल्या बसखाली एका विद्यार्थिनीचा मृत्यू ( Girl Dead in Bus Accident Nashik ) झाल्याची घटना घडली आहे. रस्ता ओलांडताना तिचा बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बस अपघातात झाली गंभीर जखमी -

मिळालेल्या माहिती नुसार, दुपारी 3 वाजेच्या सुमारास नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी एमएच 15 बीएल 3455 ही बस जुन्या सीबीएस बस स्थानकावरून निघाली होती. याच वेळी वैशाली गायकवाड ही विद्यार्थिनी रस्ता ओलांडत होती. यादरम्यान ती बसच्या चाकाखाली आल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला आजूबाजूच्या नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर झाल्याने काही वेळातच उपचार सुरु असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

'वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे'

काही महिन्यांपूर्वी त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा रस्ता स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. तरी देखील ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्ते आद्यवत झाले तरी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा - Hijab Controversy In Maharashtra : हिजाब समर्थनार्थ महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात झाले आंदोलन, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.