नाशिक - शहरात एका इडली विक्रेता व्यक्तीकडून पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. Nashik Crime मुंबई नाका पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. यामागे बनावट नोटा विक्री करणारी टोळी कार्यरत आहे का याचाही तपास केला जातोय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथील मुंबई नाका भागातील भारत नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मलायारसन मदसमय ( वय 33 मुळ राहणार तामिळनाडू ) या इडली विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून 500 रुपये किमतीच्या 40 नोटा, तर 2000 रुपये किमतीच्या 244 बनावट नोटा, मोबाईल असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Nashik Crime संशयितास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संशयित मलायारसन हा गेल्या पंधरा वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास होता. त्याने या नोटा आणल्या कुठून व यामध्ये अजून कोण-कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.
3 हजार रुपयात घेतल्या 5 लाखांच्या नोटा संशयित मलायारसन मदसमय याने तामिळनाडू येथून अवघ्या 3 हजार रुपयात घेतल्या 5 लाखांच्या बनावटा नोटा खरेदी केल्या होत्या,नुकतीच नाशिक मध्ये श्री कालिका देवी यात्रा झाली. या यात्रेत त्याने 2 हजारांच्या तीन ते चार बनावट नोटा वापरल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे,तसेच काही वर्षांपूर्वी संशयीताची पत्नी मुलांसह त्याला सोडून निघून गेल्यानं तो नाशिक मध्ये एकटाच राहत आहे.
नोटांवर महात्मा गांधींचा वॉटरमार्क नाही पाचशे आणि दोन हजारांच्या बनावट नोटांवर महात्मा गांधी यांचा वॉटरमार्क नाही,शिवाय सिक्युरिटी थ्रेडच्या जागी रेडियमचे तुकडे चिकटविले आहेत. संशयीत मलायारसन मदसमय याने तामिळनाडू येथील कोणाकडून नोटा विकत घेतल्या याचा खोलवर तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.