ETV Bharat / city

Fear Of Epidemics वातावरण बदलामुळे लहान मुलांमध्ये साथीचे आजार, टोमॅटो फ्लूची भीती - Cold cough fever

नाशिक मध्ये पावसाची ये जा सुरू असून वातावरणात रोज बदल होत due to climate change आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी Fear of epidemics डोके वर काढले असून यात शितलहरींमुळे सर्दी,खोकला,ताप Cold, cough, fever या साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे लहान मुले यामुळे अधिक बाधित होत आहेत. यातच पसरत असलेल्या टोमॅटो फ्लूची tomato flu in children पण भीती व्यक्त केली जात आहे.

Epidemic outbreaks
साथीचे आजार
author img

By

Published : Aug 21, 2022, 6:52 PM IST

नाशिक नाशिक मध्ये पावसाची ये जा सुरू असून वातावरणात रोज बदल होत आहे. त्यामुळे due to climate change साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यातच शितलहरींमुळे सर्दी, खोकला, ताप या साथीच्या आजारांमध्ये वाढ Fear of epidemics झाली आहे. बदलत्या हवामानामुळे लहान मुलांना साथीच्या आजार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच दूषित हवेमुळे न्यूमोनिआ, बालदमा याचे प्रमाण वाढते. तसेच घराचा परिसर दूषित असेल तर डास, माशांचे प्रमाण वाढते आणि यामुळे मलेरिया,डेंग्यू आजराचा प्रादुर्भाव वाढतो.

पावसाळ्यात लोक निसर्ग पर्यटना साठी घराबाहेर पडतात. सुट्टीचा दिवस साधून अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी, धबधबा, डोंगर परिसरात पर्यटनासाठी जातात, अशावेळी काळजी घ्यावी असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. पावसाळयात बहुतांश साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो, अशात घरातील लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, शक्यतो घरातीलच अन्नपदार्थ खावे बाहेर चे अन्न टाळावे, उबदार कपडे घालावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरात आणि घराबाहेर पडतांना नागरिकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे..


आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आत्तापर्यंत मे ते जुलै महिन्यादरम्यान, टोमॅटो फ्लूची tomato flu in children तब्बल 82 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यात 5 वर्षाखालील बहुसंख्य मुलांचा समावेश आहे.केरळ मधे टोमॅटो फ्लूचे संशयीत रुग्ण सापडत आहेत. टोमॅटो फ्लू हा आजार गंभीर किंवा जीवघेणा आहे, याचा कोणताही पुरावा नाही.मात्र असे असले तरी, संक्रमित झालेल्या मुलांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. टोमॅटो फ्लू हा आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा tomato flu सावधान लहान मुलांमधे वेगाने पसरतोय टोमॅटो फ्लू

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.