ETV Bharat / city

ST Employee Suicide Attempt: पंचवटीत एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्राण वाचवण्यात डाॅक्टरांना यश - ST Employee Strike Attempt

सध्या एसटी महामंडळाचे हजाराे कर्मचारी विलिनीकरण व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, म्हणूण बेमुदत संपावर ( ST Employees strike in Nashik ) आहेत. अजूनही या संपावर ताेडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. त्यातच संप चिघळत चालला आहे. विशाल प्रकाश कुमावत (३५, रा. रामकृष्णनगर, देवी मंदिरासमाेर, शांती नगर, पंचवटी) हे शहरातील डेपाे नंबर एकमध्ये बस चालक म्हणून नियुक्तीला आहेत. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न ( ST employee suicide attempt ) केला आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारा कर्मचारी
आत्महत्येचा प्रयत्न करणारा कर्मचारी
author img

By

Published : Dec 18, 2021, 3:18 PM IST

Updated : Dec 18, 2021, 3:30 PM IST

नाशिक - पंचवटीतील शांतीनगर भागात राहणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याने विष पिऊन तसेच गळफास लावून घेत आत्महत्या ( ST employee suicide attempt ) करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याला वाचवण्यात यश आले आहे. विशाल प्रकाश कुमावत असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सध्या एसटी महामंडळाचे हजाराे कर्मचारी विलिनीकरण व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, म्हणूण बेमुदत संपावर ( ST Employees strike in Nashik ) आहेत. अजूनही या संपावर ताेडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. त्यातच संप चिघळत चालला आहे.

हेही वाचा-ST Workers Strike : अंगावर फुले फेकून जळगावातील एसटी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन

कुटुंब कसे चालवायचे असा कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न ?

विष खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न

वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कुटुंब कसे चालवायचे, असा यक्ष प्रश्न कर्मचाऱ्यांसमाेर उभा आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय स्विकारून जीवनयात्रा संपविली ( ST employees deaths during strike ) आहे. तर काही कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहेत. विशाल प्रकाश कुमावत (३५, रा. रामकृष्णनगर, देवी मंदिरासमाेर, शांती नगर, पंचवटी) हे शहरातील डेपाे नंबर एकमध्ये बस चालक म्हणून नियुक्तीला आहेत. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा-VIDEO : ST Worker Strike - औरंगाबाद आगारातील काही कर्मचारी कामावर रुजू

वेळीच उपचार मिळाल्याने चालकाचे प्राण वाचविण्यात डाॅक्टरांना यश
विशाल कुमावत यांनी गुरुवारी रात्री अकरा वाजता घरी असताना गळफास लावण्याचा प्रयत्न केला. रेडीसीन विष खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना समजताच विशाल यांचे वडील प्रकाश फकिरा कुमावत यांनी रात्री अडीच वाजता मुलाला रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने विशाल यांचे प्राण वाचवण्यात डाॅक्टरांना यश आले आहे. याबाबत म्हसरुळ पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. म्हसरुळ पाेलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा-ST Workers Strike : बस झालं..! आता एसटी सुरू करा, म्हणत विद्यार्थी उतरले रस्त्यावर; पन्हाळा तालुक्यात निदर्शने

कामगारांना दिला इशारा-
एसटी कर्मचारी संपाचा तिढा कायम ( unsolved issue of employees strike ) आहे. कामगारांसाठी सर्वाधिक पगारवाढ दिली आहे. पगार वेळेत देण्याची हमी घेतली आहे. तरीही कामगार संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाची एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. राज्य सरकारकडून कर्मचारी बडतर्फ करण्यात येत आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांनी संपातून काढता पाय घेतला नाही. ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

Last Updated : Dec 18, 2021, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.