ETV Bharat / city

Human Organ Case : नाशकात डाॅक्टरनेच ठेवले 'ते' मानवी अवयव; अधिक तपास सुरु - डाॅक्टरनेच ठेवले दवाखाण्यात मानवी अवयव

डाॅ. किरण शिंदे यांनी सन 2000 मध्ये मुंबईतील नानावटी रुग्णालयातून हे अवयव परीक्षण व अभ्यासासाठी नाशिकमध्ये आणले हाेते. तसेच सन 2005 मध्ये या अवयवांच्या कंटेनरमध्ये फाॅर्मेलीन व पाणी तसेच अन्य केमिकल टाकून जतन केले हाेते. तेव्हापासून त्यांनी हा गाळा लावला. 20 ते 22 वर्षांपासून उघडलाच नाही. याबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी सांगितले की, महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार अभ्यासाच्या हेतूने मानवी अवशेष उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना आहेत.

मानवी अवयव प्रकरण
मानवी अवयव प्रकरण
author img

By

Published : Mar 29, 2022, 9:27 PM IST

नाशिक - मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या हरी विहार सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये आढळलेले मानवी अवयव हे गाळामालक महिलेच्या डाॅक्टर मुलानेच ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. किरण विठ्ठल शिंदे असे या कान, नाक व घसा तज्ज्ञ डाॅक्टरचे नाव आहे. दरम्यान, पाेलिसांनी डाॅ. शिंदे यांचे जाबजबाब नाेंदविणे सुरु केले असून त्यांनी हे अवयव खासगी ठिकाणी कसे बाळगले, याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

गाळा लावला व 20 ते 22 वर्षांपासून उघडलाच नाही : मुंबई नाका पाेलीस, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यासंदर्भात महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार तपास व चौकशी करणार आहे. डाॅ. किरण शिंदे यांनी सन 2000 मध्ये मुंबईतील नानावटी रुग्णालयातून हे अवयव परीक्षण व अभ्यासासाठी नाशिकमध्ये आणले हाेते. तसेच सन 2005 मध्ये या अवयवांच्या कंटेनरमध्ये फाॅर्मेलीन व पाणी तसेच अन्य केमिकल टाकून जतन केले हाेते. तेव्हापासून त्यांनी हा गाळा लावला. 20 ते 22 वर्षांपासून उघडलाच नाही. याबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी सांगितले की, महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार अभ्यासाच्या हेतूने मानवी अवशेष उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना आहेत. त्यामुळे या घटनेचा तपास जिल्हा शल्यचिकित्सक करतील. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील पाेलीस कारवाई केली जाईल. शुभांगीनी शिंदे यांच्या मालकीच्या गाळा नंबर 20 मध्ये रविवारी रात्री प्लास्टिक बादल्यांमध्ये जतन केलेले आठ कान व मष्तिष्क (डाेके) आढळून आले हाेते. माहिती कळताच पाेलीस उपायुक्त पाैर्णिमा चाैगुले, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनिल राेहाेकले, चंद्रकांत आहिरे व फाॅरेन्सिक एक्सपर्ट दाखल झाले हाेते.

येथेच असते बाॅडीपार्टसला परवानगी : अनाटाॅमी कायद्यानुसार मेडिकल प्राेजेक्ट किंवा वैद्यकीय अभ्यासासाठी वैद्यकीय विद्यार्थ्याना मृतदेह हाताळणी, शवचिकित्सेसाठी फक्त वैद्यकीय संशाेधन महाविद्यालय, शवविच्छेदन केंद्र, न्यायवैद्यक प्रयाेगशाळा, वैद्यकीय विद्यापीठ व जिल्हा रुग्णालयात परवानगी असते. मात्र, हे अवयव थेट खासगी व रहिवासी ठिकाणी कसकाय आले हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

'पाेलिसांना सहकार्य करु' : पोलिसांकडून अवयवांबद्दलचे पत्र मिळाले आहे. या घटनेची शरीरशास्त्र कायद्यानुसार चाैकशी केली जाईल. अनाटाॅमी अँक्टनुसार परवानगी मिळालेल्या संस्थांमध्येच मानवी अवयव अभ्यासासाठी ठेवता येतात. माझ्या सेवा काळात पहिल्यांदाच असा प्रकार घडला. तरी पूर्ण माहिती घेत तपासणी करत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पुण्यात महिलांवरील अत्याचार वाढला.. 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तर 19 वर्षीय तरुणीवर अश्लील कृत्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.