नाशिक - मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते. त्यांचे नाव देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले ( Devendra Fadnavis on name of Marathi Sahitya Sammelan ) असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
'हे कसले सावरकरांचे वारसदार' -
काही दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले तेव्हा माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे शिवसेना सदस्य म्हणतात. मग हे कसले सावरकरांचे वारसदार हा निर्लज्जपणा आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांना लाज वाटली पाहिजे अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis attack on shiv sena ) यांनी शिवसेनेवर केली. नाशिकला आयोजित भाजपा पदाधिकारी मेळाव्या प्रसंगी ते नाशिकला ( BJP office bearers meet Nashik ) आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
नैराश्यत बोलत -
जावेद अख्तर यांच्यासारखे लोक एकांगी कोणाच्या तरी प्रेरणेतून बोलतात, पण आशा लोकांनी पुरस्कार परत करून बघितले, टीका केली पण, लोक मोदींच्या मागे आहेत त्यामुळे ते नैराश्यच बोलत आहेत.
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा! -
केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.
म्हणून कुसुमाग्रजांचे नाव दिले -
मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते. त्यांचे नाव देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले असे फडणवीस यांनी म्हटले आहे.