नाशिक - नाशिक हे सायकल कॅपिटल शहर म्हणून ओळखू लागले आहे. दिवसेंदिवस सायकलिस्टची संख्या वाढत आहे. शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रक होणं गरजेचं असून, स्मार्ट सिटी अंतर्गत तयार होणारे दोन सायकल ट्रक लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने केली आहे.
हेही वाचा - शरद पवार गॉडफादर, सरकारवर कंट्रोल तरी आरक्षण का नाही? - चंद्रकांत पाटील
आध्यत्मिक, धार्मिक, कुंभनगरी, वाईन कॅपिटल सिटी अशी जागतिक ओळख असलेलं नाशिक शहर आता सायकल कॅपिटल सिटी म्हणून ओळखू लागले आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस सायकलिस्टची संख्या वाढत असून, अनेक जण आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी सायकलिंगकडे वळू लागले आहेत. नाशिकच्या सायकलपटूंनी अल्पावधीतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव पोहचवले आहे. नाशिकमध्ये सायकल ही एक चळवळ झाली असून, पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चळवळीला अधिक वाव देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत दोन सायकल ट्रक तयार करण्यात येत आहेत. या सायकल ट्रकचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी नाशिक सायकल असोसिएशनने केली आहे.
नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक सिग्नल आणि त्र्यंबक सिग्नल ते पपया नर्सरीपर्यंत सायकल ट्रक साकारण्यात येत आहे. या ट्रकचे काम अंतिम टप्प्यात आलं असून, सीबीएसजवळ जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, शाळा, कॉलेज असल्याने याठिकाणी मोठी गर्दी असते. या भागात पार्किंगची समस्या असल्याने वाहने सायकल ट्रकवर पार्किंग केले जात असल्याने याभागातून सायकल चालवणे तर लांबच राहिले पण चालायला देखील जागा मिळत नाही.
सायकलिस्ट महिलांचा वाढता सहभाग
घरातील महिला निरोगी तर कुटुंब निरोगी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच नाशिक सायकल असोसिएशनमध्ये 400 हून अधिक महिला असून यातील बहुतांश महिला रोज सायकलिंग करतात. नाशिक सायकल असोसिएशनकडून दरवर्षी नाशिक ते पंढरपूर सायकलवारी काढली जाते. या वारीत 700 ते 800 सायकलिस्ट सहभागी होत असतात त्यातही सर्वधिक महिलांचा सहभाग असतो.
हेही वाचा - 'ग्लोबल टीचर' डिसले गुरुजींना पुन्हा बहुमान; जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड