ETV Bharat / city

येवल्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे किंमतीमध्ये दरवाढ केली जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

author img

By

Published : Jul 3, 2020, 3:50 PM IST

Congress protests against petrol-diesel price hike in Yeola
येवल्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

येवला (नाशिक) : येवला तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये केलेल्या दरवाढीच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर कमी करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली.

संपुर्ण जग सध्या कोरोना संसर्ग रोगाच्या महामारीने त्रस्त आहे. या संसर्ग रोगाच्या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहे. उद्योगधंदे बंद पडले आहे, बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. जनता जीवन जगण्याची धडपड करत आहे. अशा कठीण परिस्थितीत परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. दिनांक ०७ जून २०२० पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सदर दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर ९.१२ रुपये तर डिझेलमध्ये हे प्रतिलिटर ११.०१ रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किंमती प्रति लीटर ८७-८८ रुपयाच्या पुढे गेल्या आहेत, तर डिझेल पेट्रोलपेक्षाही महाग झाले आहे.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सीडीएस प्रमुख बिपीन रावत लडाखमध्ये दाखल

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे किंमतीमध्ये दरवाढ केली आहे. सदरची दरवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारुळे यांना करण्यात आली.

यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी झाली पाहिजे, यासाठी मोदी सरकार विरोधात घोषणा देऊन तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. एकूणच झालेली इंधन दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी येवला तहसील कार्यालवर काँग्रेसच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.