नाशिक - जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते, हे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा, तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते राज्यातच कसे राहील याकडे लक्ष द्या, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भुजबळ फार्म येथे झालेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आढावा बैठकीत ते बोलत होते.
हेही वाचा - आठवडाभरात एसटी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही, तर रस्त्यावर उतरु - प्रवीण दरेकर
सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे, यासोबतच नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता या स्वतंत्र पदाची निर्मिती विचाराधीन असून त्याचे कार्यालय नाशिक येथे निर्माण करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा - अजित पवारांनीच केला शरद पवारांचा गेम - निलेश राणे