ETV Bharat / city

खडसे यांची ईडी कारवाई राजकीय आकसापोटी - छगन भुजबळ

एकनाथ खडसे यांच्यावर ईडीकडून होणारी कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भाजपात यावे किंवा भाजपामधून बाहेर जाऊ नये यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे, नाशिक जिल्ह्यातील कोरोनो आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : Jul 9, 2021, 4:42 PM IST

नाशिक - एकनाथ खडसे यांच्यावर ईडीकडून होणारी कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भाजपात यावे किंवा भाजपामधून बाहेर जाऊ नये यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनो आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.

'खडसे यांची ईडी कारवाई राजकीय आकसापोटी'

'खडसेंवरील कारवाई राजकीय आकसापोटी'

अनिल देशमुख असो की एकनाथ खडसे यांच्यावर ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय आकसापोटी होत असून मी देखील त्यातून गेल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भाजपामधून बाहेर पडल्यावर कारवाई होते, असे याला म्हणावे लागेल असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे.

भुजबळांनी घेतला आढावा
नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत म्यूकरमायकोसिस संख्या 104 वर असून म्यूकरमायकोसिसमध्ये 10 टक्के मृत्यू होत आहेत. यावर उपचार करणारी अँफोथरेसिन इंजेक्शन अद्याप मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात कोरोनोचा प्रादुर्भाव कमी होत आहे. सद्यस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट 1.22 टक्के इतका आहे. तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. या लाटेत सव्वा लाख बालक बाधित होतील, असा अंदाज पकडून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 5 हजार बेडचे नियोजन करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात 12 लाख लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 3 लाख 18 हजार लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. केंद्राकडून 4 ऑक्सिजन प्लांट येणार होते, मात्र आता 2 प्लांटच येणार आहे. ऑक्सिजन देखील मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील कंपन्यांचा सीएसआर निधी कोविड कामासाठीच वापरण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ

नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. येवल्यात 20 रुग्ण होते. आता 40 झाले आहेत. लग्न, गर्दी, मास्क न वापरणे यामुळे रुग्ण वाढल्याचा संशय असून आता या पुढे लग्न समारंभात 50 लोक आहेत की जास्त याची तपासणी केली जाणार आहे. लग्न कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल गनने पतपासणी करा, सॅनिटायझरचा वापर करा, या शिवाय लग्नाला परवानगी नाही, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

लसीकरण वाढवण्यासंदर्भात सूचना
स्फुटणीक लस काही दिवसात दाखल होईल, आम्ही रोज 1 लाख लोकांचे लसीकरण करू शकतो पण साठा पुरेसा नाही, नाशिकच्या भारती पवार केंद्रात राज्यमंत्री झाल्या आहेत. त्यांची देखील मदत घेऊन लस मिळवण्यासाठी मदत घेऊ, पंतप्रधान यांनी देखील लसीचा साठा उपलब्ध केल्यास सगळ्यांना मदत होईल, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

'मी फडणवीस यांच्या मताशी सहमत'
मुंडे भघिनी नाराज असल्याबाबत माहिती नाही, मी फडणवीसांच्या मतापुढे जाऊ शकत नाही, त्यांनी सांगितले की मुंडे यांची बदनामी करू नका, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - आम्ही नाराज नाही, मंत्रिपद मिळालेल्यांविषयी आनंदीच, पंकजा मुंडेंनी दिले स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.