नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे, यामुळे यंदा छट पूजेच्या दिवशी नाशिकच्या गोदावरी नदी काठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी कलम 144 आदेश जारी केला आहे. तसेच नागरिकांनी छट पूजा घरीच साजरी करावी असे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये कलम 144 लागू -
उत्तर भारतीयांचा छट पूजा सण देशभरात साजरा केला जातो. यावेळी महिला नदीत उतरून सूर्याला अर्क देत पूजाअर्चा करतात. अशात दरवर्षी नाशिकच्या गोदावरी तरी उत्तर भारतीय नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने कडक नियम लागू केले आहेत. याच अनुषंगाने यंदा भाविकांनी छट पूजा सण घरीच साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. अशात कोणी कोरोना नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्या विरोधात कलम 144 नुसार कारवाई केली जाणार आहे.
प्रमुखांची बैठक -
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने यंदा छट त्याचा पूजा सण नदी, तलाव, समुद्र याठिकाणी सार्वजनिक रित्या साजरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांची माहिती देण्यासाठी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात उत्तर भारतीय नागरिकांचे प्रमुख 10 ते 15 जणांची बैठक संपन्न होउन त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी माहिती दिली. अशात कोणी नदी काठी दिसल्यास त्यांच्या विरोधात कलम 144 नुसार कारवाई करण्यात आहे.
हेही वाचा - छटपुजेला येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी आणि लसीकरण; मुंबई महापालिकेचा निर्णय
हेही वाचा - सांगा अडीच हजारात दिवाळी कशी साजरी करायची? अश्रूंच्या फुटलेल्या बांधातून एसटी महिला वाहकाचा प्रश्न