नाशिक - कोरोनाच्या लसीबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत असताना आता नाशिकच्या एका जेष्ट नागरिकाने कोरोनाची दुसरी लस घेतल्या नंतर त्यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या आहेत. या घटनेची नाशिकमध्ये चर्चा होत असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सहज म्हणून शरीराला लोखंडी वस्तू लावल्यावर चिकटू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीराला स्पर्श झाल्यावर बल्ब लागतो असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांनी त्याच्या शरीराला लोखंडी वस्तू लावून बघितल्या. तर आश्चर्य म्हणजे त्या चिकटत आहेत. या बाबत 'ईटीव्ही भारत' ने रियालीटी चेक करून सत्य जाणून घेतले.
हेही वाचा - आजीने दिले दीड वर्षीय चिमुकल्याच्या पोटाला गरम विळ्याने चटके, अखेर दुर्दैवी मृत्यू
नाशिकमध्ये कोरोनाची लाट कमी होत असताना शासन पातळीवर लसीकरण जोरात सुरू आहे. मात्र, लसीकरणा नंतर सिडको भागातील अरविंद सोनार यांच्या शरीरात वेगळे बदल झाले आहेत. सोनार यांच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकू लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, या विषयावर संशोधन करावे लागेल, असे डॉक्टरांनी सोनार यांना सांगितले आहे.
हेही वाचा- Manhole Horror उघड्या गटारात पडल्या २ महिला, घटना सीसीटीव्हीत कैद
लस घेतल्या नतंर शरीर झाले लोह चुंबक
मी दोन दिवसांपूर्वी 84 दिवसांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची दुसरी लस घेतली. लस घेतल्यानतंर मला कुठलाच त्रास जाणवला नाही. माझ्या मुलाने मोबाईलवर लसीबाबत दिल्ली येथील एक बातमी बघितली. त्यात लस घेतल्यानतंर शरीराला लोखंडी वस्तू चिटकतात, असे त्याने मला सांगितल्यावर मी देखील प्रयोग करून बघितला. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या हाताच्या दंडाला, छातील कॉईन, चमचा, उचटनी चिटकू लागले. सुरवातीला मला वाटले घामामुळे वस्तू चिटकत असतील, मग मी आंघोळ केली, मात्र तरी देखील वस्तू चिटकत आहे. माझे 10 वर्षांपूर्वी बायपासचे ऑपरेशन झाले. मात्र, आता पर्यंत कधीच असे झाले नाही, असे अरविंद सोनार यांनी म्हटले.
हेही वाचा- Mystery Girl.. गर्लफ्रेंडला घरातच लपवलं चक्क 10 वर्ष, आईवडीलांनाही लागला नाही थांगपत्ता
गंमत म्हणून केले आणि खरे झाले.
माझ्या आई आणि वडिलांनी दोघांनीही कोविशिल्डची दुसरी लस घेतली. मी एक व्हिडिओ बघितला होता, त्यात लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकत होत्या. मी गंमत म्हणून वडिलांना सांगितले की, तुम्हीसुद्धा लोखंडी वस्तू तुमच्या हाताच्या दंडाला लावून बघा. वडिलांनी देखील गंमत म्हणून लावून बघितले तर आश्चर्य असे की, त्यांच्या हाताला आणि छातीला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या, चमचा, कॉईन, उचटणी अशा वस्तू चिटकू लागल्याने आम्हाला देखील आश्चर्य वाटले, मात्र आईच्या बाबतीत, असे झाले नाही, असे अरविंद सोनार यांच्या मुलाने सागितले.
हेही वाचा- बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी
संशोधन करावे लागेल
कोरोनाची लस घेतली आणि शरीर चुंबकीय झाले, असे कधी ऐकले नाही. मात्र, याचे संशोधन करावे लागेल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.
जेष्ट नागरिकाने केलेला दावा खोटा - रंजना गवांदे, अंनिस
कोरोणा लसीचा दुसरा डोस घेतल्यनंतर अंगात चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा नाशिक येथील एका जेष्ट नागरिकाने केला आहे. त्या बाबत आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे अहमदनगर येथील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्या रंजना गवांदे यांनी लस घेतल्याने कोणतेही चुबकत्व शरीराला निर्माण होत नसून हा केवळ हवेच्या दाबामुळे होणारा प्रकार असल्याचे म्हंटले.
संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्या रंजना गवांदे यांनी त्यांच्या पतीने अशोक गवांदे यांनी अद्याप एक डोस घेतला असताना त्याच्या अंगावरही स्टिलची भांडी चिटकत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करत चुबकत्व निर्माण होत असल्याचा दावा खोडून काढला आहे. हा दावा पूर्णत: चुकीचा आहे. लसी संदर्भात असे चुकीचे दावे न करण्याचे अवाहन त्यांनी यावेळी केला. शरीराला घाम असताना प्लास्टिकच्या वस्तू पण चिकटतात, त्या नाशिकच्या जेष्ट नागरिकाने पायाच्या भागाजवळ भांडी का चिटकून दाखलवी नाही, असा सवाल रंजना गवांदे यांनी उपस्थित केला आहे.
लसीकरणाबाबत आधीच नागरिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पसरवले गेले असल्याने नागरिक लस घेण्यास घाबरत आहे. त्यात आता नाशिक येथील एका जेष्ट नागरिकाने कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या, असा केलेला दावा चुकीचा असून नागरिकांनी घाबरून न जाता लस घेण्याचे आवाहन रंजना गवांदे यांनी केले.
वैज्ञानिक, वैद्यकीय दृष्ट्या तपासणी करू - टोपे
असा प्रकार निरदर्शनास आला आसेल तर त्याची पूर्ण वैज्ञानिक, वैद्यकीय दृष्ट्या तपासणी करू, त्यानंतर टिप्पणी केल्याचे योग्य राहील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
हेही वाचा - घरपट्टी माफ करा, येवला व्यापारी महासंघाची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी